स्वछता ही सेवा विद्यार्थ्यनी दिला संदेश

सातारा – स्वछता ही सेवा आहे आणि ती कृतीतून जपली पाहिजे असा संदेश आज ज्ञानभारती ब्लॉसम स्कुलच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिसर स्वछता करून दिला. सातारा सदर बझार येथील देशमुख कॉलनी मध्ये शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी म. गांधीजी तसेच लाल बहादूर शास्त्री याच्या जयंती च्या निमित्ताने शाळेच्या आवारात तसेच परिसराची स्वछता केली.

हातामध्ये झाडू घेऊन विद्यार्थी स्वछता करत आहेत हे पाहून नागरिक देखील मुलांचे कौतुक करत होते. आपला परिसर स्वछ ठेवा. कचरा हा घंटा गाडीतच टाका. अस्वच्छता करू नका. या बरोबर साथीच्या आजाराचा सामना करताना परिसर स्वछ ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्या असा संदेश ही मुले नागरिकांशी संवाद करून देत होती.

-Ads-

राष्ट्रपिता गांधीजी यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र संपूर्ण देशभरात रुजवला. त्यामुळे “”जय जावान, जय किसान” हा नारा देणाऱ्या थोर विभूती लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याची देखील माहिती विद्यार्थांस शाळेने करून दिली. या उपक्रमाचे आयोजन शाळेच्या संचालिका मयूरा गायकवाड यांनी केले होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)