स्वच्छ सुंदर फलटणसाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा

फलटण ः महास्वच्छता अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ना. रामराजे नाईक-निंबाळकर, विद्यार्थी, पत्रकार.

ना. रामराजे नाईक-निंबाळकर : महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ

फलटण, दि. 4 (प्रतिनिधी) – फलटण शहरात स्वछतेबाबत नगरपालिका दक्षता घेत असली तरी नागरिकांनी स्वत:हून स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्यास शहर शंभर टक्के स्वच्छ आणि सुंदर होईल, अशी अपेक्षा ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली.
स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत फलटण शहरात लोकसहभागातून महास्वच्छता अभियान राबवण्याचा शुभारंभ नगरपालिकेच्या वतीने आणि विविध सामाजिक संस्था, संघटना, शालेय विद्यार्थी, पत्रकार,यांच्या उपस्थितीत झाला. नगरपालिका समोर खुद्द रामराजे यांच्या शुभहस्ते कचरा साफ करूनच मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा निताताई नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोइटे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, पंचायत समिती सभापती प्रतिभा धुमाळ, सदस्य विश्वजितराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ट नेते सुभाषराव शिंदे, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, नगरपालिकेच्या पाणी पुरवठा सभापती सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, आरोग्य समिती सभापती वैशालिताई अहिवळे, महिला व बालकल्याण सभापती ज्योत्स्ना शिरतोडे, सर्व नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, नगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कचरा उचलण्यापेक्षा, कचरा योग्य ठिकाणी टाकण्यासाठी आणि कचरा न करण्यासाठी जनजागृती आवश्‍यक असून महास्वच्छता अभियानाद्वारे याकामी पुरेसा लोक सहभाग मिळवता आला तर योग्य जनजागृतीद्वारे स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त करणे फलटणकरांना सहज शक्‍य होईल, असा विश्‍वास संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.
स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत फलटण शहरात लोकसहभागातून महास्वच्छता अभियान आज विविध प्रभागात 8 ते 11 यावेळेत राबविण्यात आले. त्याच्या नियोजनासाठी शहराच्या विविध भागात ठेवण्यात आलेल्या कचरा कुंड्या काढण्यात आल्या असून घंटागाडीद्वारे संपूर्ण शहरातील ओला व सुका कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक प्रभागात ज्या त्या नगरसेवकांनी नागरिकांना सोबत घेऊन स्वछता मोहीम राबवली. प्रत्येक प्रभागात जाऊन संजीवराजे नाईक-निंबाळकर, नगराध्यक्षा निताताई नेवसे यांनी आढावा घेतला. विविध शाळा, पत्रकार संघटना, सामाजिक संस्था यांनी महास्वच्छता अभियानात सहाभाग नोंदविला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)