स्वच्छ सर्व्हेक्षणात महिलांचा सहभाग वाढविणार

जेजुरी- 2019 मध्ये होणाऱ्या स्वच्छ सर्व्हेक्षणात जेजुरी पालिकेने सहभाग घेतला असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. या अभियानात महिलांचा मोठा सहभाग वाढावा यासाठी शहरातील बचग गटातील सर्व महिलांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या अभियाना अंतर्गत शहरामध्ये साफ-सफाई करणे, कचरा गोळा करणे, भितीचित्र काढणे, प्रबोधन करणे आदी कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी दिली. या कार्यशाळेत ग्रीनी या संस्थेच्या वतीने महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. ओला-सुका कचरा व घातक कचरा याबाबत प्रोजेक्‍टरवर माहिती देण्यात आली. यावेळी नोडल अधिकारी बाळासाहेब बगाडे, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, आरोग्य सभापती बाळासाहेब सातभाई, कर निरीक्षक प्रमिला सरोदे, आरोग्य पर्यवेक्षक प्रसाद जगताप, आरोग्य विभागप्रमुख राजेंद्र गाढवे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)