“स्वच्छ सर्वेक्षण 2019′ स्पर्धेत लोणावळा शहराला दोन मानांकने

लोणावळा – संपूर्ण देशपातळीवर सध्या सुरू असलेल्या “स्वच्छ सर्वेक्षण 2019′ स्पर्धेत लोणावळा शहराला दोन विभागात मानांकन मिळाले असून, अशा संदर्भातील माहिती नुकतीच केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने महाराष्ट्र शासनास कळविली आहे. या स्पर्धेचे मुख्य पारितोषिक वितरण 6 मार्च रोजी दिल्ली येथे होणार आहे.

2018 च्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सातव्या क्रमांकावर राहिलेल्या लोणावळा नगरपरिषदेला 2019 च्या स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या पाच क्रमांकात आणण्यासाठी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्यासह सर्व नगरसेवक आणि नगरपरिषद कर्मचारी वर्गाने कंबर कसली आहे. नगराध्यक्षा जाधव यांनी तर जोपर्यंत संपूर्ण लोणावळा शहर कचराकुंडी मुक्‍त होणार नाही, तोपर्यंत कोणत्याही कार्यक्रमात मग तो सार्वजनिक असो व वैयक्‍तिक असो, सत्कार स्वीकारणार नाही, असा पण केला होता. अखेर या सर्व प्रयत्नांना यश मिळाले. कचराकुंडी मुक्‍त शहर या विभागासह स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या पहिल्या पाच शहरामध्ये लोणावळा शहराचे परितोषिकासाठी मानांकन जाहीर करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंगळवारी यासंदर्भात माहिती मिळताच संपूर्ण शहरात आनंद व्यक्‍त करण्यात आला. लोणावळा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नागसेवकांनी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांचे अभिनंदन करित पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. नगराध्यक्षा जाधव यांनी आभार मानत, मिळालेले यश हे सर्व लोकप्रतिनिधी, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी आणि लोणावळेकर नागरिकांचे असल्याचे सांगत स्वच्छतेबाबत भविष्यात सर्वांची जबाबदारी अजूनही वाढली असल्याचे स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)