स्वच्छ सर्वेक्षण मोहीमेत जनतेने पुढाकार घेण्याचे आवाहन

पुणे – पुणे जिल्ह्यात गावपातळीवर विविध कार्यक्रमांद्वारे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मोहीम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छतेबाबत कामे सुरू असून जिल्ह्यात तीन चित्ररथांद्वारे मोहिमेची प्रचार प्रसिध्दी सुरू आहे. तरी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व जनतेने पुढाकार घ्यावा, असे अवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

दरम्यान, नागरिकांनी “एसएसएस’ हे स्वच्छ सर्वेक्षण ऍप मोबाईलवर डाऊनलोड करून त्यातील प्रश्‍नांची उत्तरे देऊन पुणे जिल्हा स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल येण्यासाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

-Ads-

केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे गुणांकन ठरविण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक महान अंकांच्या आधारे स्वतंत्र सर्वेक्षण संस्थेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण हा देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत आहे. हे सर्वेक्षण स्वच्छते संदर्भातील घटकांबाबत करण्यात येणार असून त्यासाठी गुणांकन पद्धती केंद्र शासनाकडून निश्‍चित करण्यात आली आहे.

या सर्वेक्षणात सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबतच्या घटकांचा समावेश करण्यात आला असून सर्वांत जास्त गुण मिळवणाऱ्या जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरून 2 ऑक्‍टोबर 2018 रोजी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. दरम्यान, या सर्वेक्षणात ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रार्थना स्थळे, यात्रास्थळे, बाजार तळ अशा विविध ठिकाणांची तपासणी करण्यात येणार असल्याचेही मांढरे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)