स्वच्छ सर्वेक्षण : उपनगरांत ‘कचऱ्याचा धुर’

प्रशासनाचा कानाडोळा :  ढिगाला लावली जातेय गुपचूप आग

पुणे – स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिकेने स्वच्छता मोहीम तीव्र केली आहे. तर, दुसऱ्या बाजूला वडगाव शेरी येथील नदीपात्राशेजारच्या एका दफणभूमी परिसरात हजारो किलो कचरा अंधाराचा फायदा घेत गुपचूप जाळाला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वडगावशेरी येथील मुळा- मुठा नदीच्या काठावर एका समाजाची दफनभूमी असून त्याच्या बाजूला नदीपात्र आहे. मात्र, तेथे मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि कचरा आणून टाकला जातो. यामुळे या कचऱ्याचे ढीग साचताच तो उचलणे अपेक्षित असताना रात्री किंवा पहाटे तो गुपचूप पेटविला जात आहे. त्यामुळे या भागात रात्रीच्या वेळी धूर आणि जळलेल्या कचऱ्याची दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे रहिवाशांना मोठ्या त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय दफनभूमीमध्ये आलेल्या नागरिकांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

तक्रारी करूनही उपयोग नाही
गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. नदीपात्रात कचऱ्यासह राडारोडा टाकला जात असून ही बाब गंभीर आहे. त्यामुळे तातडीने हा प्रकार थांबविण्यात यावा, अशी मागणी सेव्ह द एन्व्हायरमेन्ट संस्थेचे हेमंत धमूनसे यांनी केली आहे. याबाबत महापालिका तसेच स्थानिक क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही काहीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे महापालिकेने तातडीने या प्रकाराची दखल घेऊन संबधितांवर कारवाई करावी, अशी मागणी धामुनसे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)