स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान आयुक्‍त मुख्यालयातच

पिंपरी – राज्यातील महापालिकांमधील स्वच्छचे सर्वेक्षण सुरू झाले असून 31 जानेवारी अखेर केंद्र सरकारचे पथक हे सर्वेक्षण करणार आहे. या कालावधीत प्रशासन प्रमुख असलेल्या महापालिका आयुक्‍तांना मुख्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत सर्वच महापालिकांचे आयुक्‍त या कालावधीत मुख्यालयीच असणार आहेत.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी “मशीन मोड’ पद्धतीने सुरू आहे. या अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांचे मूल्यमापन हे प्रत्यक्ष स्थळभेटींच्या आधारावर केले जाणार आहे. त्याअंतर्गत शहरातील सार्वजनिक, खासगी ठिकाणी, बस थांबा, रेल्वे स्थानक, व्यावसायिक ठिकाणे, झोपडपट्टया, भाजी मंडई अशा ठिकाणांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. केंद्र सरकारचे एक पथक महापालिका प्रशासनाने अर्जात नमूद केलेल्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. महापालिकेचे मोबाईल ऍप डाऊनलोड केलेली संख्या देखील या सर्वेक्षणात विचारात घेतली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, हे सर्वेक्षण करण्यासाठी पथक येणार असल्याने, महापालिकांनी सर्व या भेटीच्या कालावधीत परिपूर्ण तयारी करणे आवश्‍यक असल्याची सूचना देण्यात आली आहे. सर्वेक्षणाची पूर्वतयारी व सनियंत्रण योग्यरितीने होण्यासाठी या कालावधीत महापालिका आयुक्‍तांनी मुख्यालय सोडू नये, असा आदेश देण्यात आला आहे. सर्वेक्षण मूल्यमापनातील महत्त्वाचा घटक असणारे, प्रत्यक्ष निरिक्षण व नागरिकांचे अभिप्राय या घटकांबाबत विशेषत्वाने उत्तम मूल्यांकन होण्याच्यादृष्टीने व्यक्‍तिश: आवश्‍यक खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तीन अधिकाऱ्यांकडे स्वच्छतेचे पर्यवेक्षण
शहर एकदम चकाचक असावे, यासाठी कमालीचे आग्रही असलेले महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील साफसफाईच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तीन सहाय्यक आयुक्तांवर सोपविली आहे. प्रवीण आष्टीकर, चंद्रकांत इंदलकर आणि मंगेश चितळे या तीन सहाय्यक आयुक्तांनी शहरातील साफसफाईच्या कामाचे पर्यवेक्षणाचे सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी सर्वेक्षणासाठी येणारे केंद्र शासनाचे पथक महापालिका प्रशासनाला पूर्वकल्पना देऊन नमूद केलेल्या ठिकाणी सर्वेक्षणसाठी येत असे. मात्र यावेळी हे पथक महापालिका प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता अर्जात नमूद केलेल्या ठिकाणांना “सरप्राईज व्हिजीट’ देणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहर सज्ज झाले आहे. आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारचे पथक कोणतीही पूर्वकल्पना न देता शहरातील विविध भागांना भेट देणार आहे. त्यामुळे या कालावधीत महापालिकेचे महत्त्वाचे अधिकारी मुख्यालयातच उपस्थित राहतील, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
– दिलीप गावडे,


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)