स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महाराष्ट्र “हागणदारीमुक्त’

   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस;राज्यात 60 लाखांपेक्षा अधिक शौचालयांचे बांधकाम

मुंबई – केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात आले. सर्व प्रशासकीय यंत्रणेने मिशन मोडवर राज्यात शौचालय बांधण्याचे काम हाती घेऊन राज्यात 60 लाखापेक्षा अधिक शौचालयाचे बांधकाम केले असून महाराष्ट्र “हागणदारीमुक्त’ झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल उपस्थित होते.

-Ads-

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात सन 2012च्या बेसलाईन सर्वेनुसार केवळ 45 टक्के कुटुंबाकडे शौचालये होती. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत 55 टक्के कुटुंबांसाठी शौचालय बांधण्याचे आवाहनात्मक काम होते. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल यांनी स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम केले आहे. त्याचबरोबर स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने नवनवीन कल्पना राबवून मिशन मोडवर काम करुन आपले उद्दिष्ट साध्य केले आहे.

विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देश प्रगती करीत असताना 50 टक्के भारतीयांकडे शौचालय सुविधा नसणे ही गंभीर बाब असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “स्वच्छ भारत अभियान’ घोषित करून 2019 पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे जाहीर केले. या अंतर्गत महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवून 2018 मध्येच महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचे काम केले आहे.महाराष्ट्रात एकूण 60 लाख 41 हजार 138 शौचालये बांधण्याचे काम करण्यात आले आहे. यासाठी 4 हजार कोटी पेक्षा अधिक खर्च केंद्र व राज्य शासनाच्या निधीमधून करण्यात आला आहे. विविध जिल्ह्यात उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करुन तेथील प्रशासकीय यंत्रणेने शौचालय बांधण्याचे काम केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)