स्वच्छ भारत कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येणार ‘उन्हाळी आंतरवासियता योजना’

नवी दिल्ली : स्वच्छ भारत कार्यक्रमाअंतर्गत १ मे ते ३१ जुलै दरम्यान विशेष उन्हाळी आंतरवासीयता योजना राबवण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात केली.

मोदी म्हणाले की, शिक्षण, क्रीडा व जल मंत्रालयाने आंतरवासीयता कार्यक्रमाची आखणी केली असून एनसीसी, एनएसएस मधील तरुण, नेहरू युवा केंद्राचे विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी यात भाग घ्यावा. शिक्षण मंत्रालयाने स्वच्छ भारत उन्हाळी आंतरवासीयता कार्यक्रम २०१८ साठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. महाविद्यालय व विद्यापीठ पातळीवर चांगले काम करणाऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार दिले जातील. हा आंतरवासीयता कार्यक्रम म्हणजे महात्मा गांधी यांना त्यांच्या दीडशेव्या जयंतीपूर्वीच मोठी श्रद्धांजली ठरेल.

या योजनेत विद्यार्थी एक किंवा अनेक खेडी दत्तक  घेऊन ग्रामीण भागात स्वच्छतेचे कार्यक्रम करू शकतील. १ मे ते ३१ जुलै दरम्यान संबंधित मुलांनी १०० तासांचे काम करायचे आहे. त्याचे आयोजन महाविद्यालये व विद्यापीठांनी करणे अपेक्षित आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विद्यार्थ्यांना या कामासाठी श्रेयांकही बहाल केले जातील. जलसंवर्धनाच्या कामात प्रत्येक भारतीयाने योगदान दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, मनरेगाअंतर्गत जलसंवर्धनासाठी कामे करण्यात आली त्याशिवाय सरासरी ३२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. रमझान व बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतानाच त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्यांचे कौतुक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)