स्वच्छ भारत अभियानासाठी…..

मोदींच्या स्वच्छ भारत अभियानासाठी
हातात धरला झाडू ,
करत होतो साफ सफाई
तेव्हा विविध विचार मनात लागले घोळू ।
झाडूने तर देश होईल स्वच्छ
आणि प्रत्येक गाव-शहर दिसेल सुंदर,
तसेच गंगेचे जल ही होईल शुद्ध
यातच मनाच्या दुसऱ्या बाजूचे विचार करू लागले मला बेशुद्ध,

जसा होतो आहे भारत देश स्वच्छ
तसेच भारतीय मने होतील का शुद्ध नि स्वच्छ
विसरतील का आपल्यातीलच द्वेष
आणि होतील का मनाने रिफ्रेश,

चालेल का झाडूची जादू
कराल का खऱ्या अर्थाने स्वच्छ अभियान सुरू,
विश्वास ठेवा स्व-कर्तृतवावर
स्वच्छ अभियानाचा आविष्कार, घडेल या पृथ्वी तलावर
करून स्वतः हून सुरुवात,
मिळेल तुम्हाला आपल्यांची साथ
आणि जोमाने देवू मोदीजींच्या
अभियानाला साथ,

त्यासाठी हवे आहेत स्वच्छ मने नि दोन कर्तृत्ववान हात ,
सर्वांनी हातात झाडू घेऊन करू अस्वच्छतेवर मात ,

मित्रांनो, मी ही आहे गांधीजींचा फॅन,
म्हणूनच सांगतो आहे तुम्हास छान,
तर मग राबवूया स्वच्छ भारत अभियान,
वाढवू अवघ्या विश्वात भारताची शान,
यातूनच घडेल आपल्या निर्मल संस्कृतीचे दर्शन सर्वार्थाने पूर्णत्वास येइल क्लीन इंडिया मिशन….

मोदीजींच्या स्वच्छ भारत अभियानाचे तुम्ही करा स्वागत,
तुमचे स्वच्छ कार्य शब्दात मांडणार विपुल भगत….!!

– विपुल भगत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)