स्वच्छ भारत अभियानाच्या जनजागृतीसाठी सतत प्रयत्नशील राहावे – बबनराव लोणीकर

मुंबई – स्वच्छ भारत अभियानाबाबत अधिक जनजागृती करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतत प्रयत्नशील असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी मंत्रालयात आयोजित सन्मान सोहळ्याप्रसंगी केले.हिंगोली, औरंगाबाद जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याबद्दल सन्मान सोहळ्याचे आयोजन पाणीपुरवठा व स्वछता विभागातर्फे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी श्री. लोणीकर यांच्या हस्ते हिंगोली आणि औरंगाबाद जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या सहभागी दोन्ही जिल्ह्याच्या चमूंचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अपर मुख्य सचिव शाम लाल गोयल, उपसचिव रुचेश जयवंशी, डॉ. सतीश उमरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)