स्वच्छ गंगेसाठी जर्मनीचे भारताला 990 कोटी रुपयांचे कर्ज

नवी दिल्ली – स्वच्छ गंगेसाठी जर्मनीने भारताला 12 कोटी युरोचे (990 कोटी रुपये) कमी व्याजदराचे कर्ज दिले आहे. जर्मन दूतावासचे अधिकारी जेस्पर वेक यांनी ही माहिती दिली आहे. उत्तराखंड राज्यातील मलनि:सारणासाठी पायाभूत सुविधा अधिक चांगल्या करंण्यासाठी या कर्जाचा वापर केला जाणार आहे.

360 किलोमीटर्स लांबीच्या मलनि:सारण पद्धतीची सुधारणा आण्‌ विस्तार करून ती प्रत्येक घराला जोडण्यात येणार आहे. यात 1.5 कोटी लिटर क्षमतेची अनेक मलजल शुद्धीकरण संयंत्रे (सीवरेज ट्रीटमेंट प्लांट्‌स) उभारण्यात येणार आहेत. यामध्ये 13 पंपिंग स्टेशन्सचा समावेश आहे. गंगेत अशुद्ध पाणी जाऊ नये आणि गंगेच्या पाण्याच्या शुद्धतेत वाढ व्हावी हा या प्रकल्पाचा हेतू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2015 मध्ये जर्मनीने भारताला 12 कोटी युरोजची गुंतवणूक करण्याबाबत प्रतिबद्धता जाहीर केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)