स्वच्छते बरोबर समृध्द गाव’चा घेतलेला वसा आदर्शवत

प्रांत संगीता चौगुले : कृष्णा नदी स्वच्छता अन्‌ गाव दत्तक योजनेच्या शुभारंभाने पत्रकार दिन साजरा

वाई – 6 जानेवारी 1812 हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आणि 6 जानेवारी 1832 हा पहिले मराठी वृत्तपत्र प्रारंभ दिन असून हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. वाई तालुका मराठी पत्रकार संघाने ऐतिहासिक, सांकृतिक महत्व असणाऱ्या कृष्णा नदीची स्वच्छता करून व वाई औद्योगिक वसाहतीजवळील शेलारवाडी हे गाव दत्तक घेवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने पत्रकार दिन साजरा केला. “स्वच्छते बरोबर समृध्द गाव’चा घेतलेला वसा आदर्शवत असून इतर पत्रकार संघाना तो दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन वाईच्या प्रांताधिकारी श्रीमती संगीता चौगुले (राजापूरकर) यांनी शेलारवाडी येथे वाई तालुका मराठी संघाच्यावतीने आयोजित केलेल्या समृध्द गाव योजना, शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल देशपांडे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अशोक सरकाळे, मनसे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य ऍड. जगदिश पाटणे,
वाई अर्बन बॅंकेचे संचालक विवेक भोसले, शिवसेना शहराध्यक्ष गणेश जाधव, स्वप्निल भिलारे, शेलारवाडीच्या सरपंच वैशाली शेलार, उपसरपंच अनिकेत शेलार, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय मर्ढेकर, तालुकाध्यक्ष विश्‍वास पवार, उपाध्यक्ष धनंजय घोडके, सचिव पी. एस. भिलारे, सहसचिव कृष्णात घाडगे, कोषाध्यक्ष संजय भाडळकर, संघटक पुरूषोत्तम डेरे, माजी तालुकाध्यक्ष विलास साळुंखे, जयवंत पिसाळ, पांडुरंग खरे, अरूण अदलिगें, गणेश किर्दत, अभिषेक पानसे,

सुधीर खाडे, ग्रापंचायत सदस्य उषा पोळ, पोर्णिमा शेलार, सचिन घाडगे, तलाठी मनिषा सावळकर, ग्रामसेवक ए. एन. प्रभुणे, मंडल अधिकारी नारायण इथापे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रातांधिकारी संगिता चौगुले म्हणाल्या, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाज मनाचे प्रतिबिंब लेखीनिच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असतो. प्रशासन व नागरिकांमधील महत्वाचा दुवा असणाऱ्या पत्रकारांनी समाजसेवेचा घेतलेला वसा हा आदर्शवत आहे.

गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर म्हणाले, शासनाच्या अनेक लोकहिताच्या योजना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्याचे काम पत्रकार संघाने केल्यास गाव समृध्द होण्यास मदत होईल. पंचायत समितीच्या माध्यमातून या उपक्रमास सर्वोतोपरी सहकार्य करू. यावेळी डॉ. सुनिल देशपांडे, अरूण अदलिगें, अनिल शेलार, संजय शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.

सकाळी सात वाजता वाई येथील कृष्णानदीवरील धर्मपुरी घाट सेवाकार्य समिती व वाई तालुका मराठी पत्रकार संघ यांनी एकत्रितपणे दोन तास परिश्रम घेवून स्वच्छ केला. व दोन ट्रॉली कचरा काढण्यात आला. यावेळी वाई नगरपालिका प्रशासन व वाईकर नागरिकांनी सहभाग घेवून सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक दत्तात्रय मर्ढेकर यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले तर विश्‍वास पवार यांनी आभार मानले. यावेळी वाई तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य, विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, शेलारवाडी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)