स्वच्छतेला जीवनात अधिक महत्त्व

  • अंकिता शहा : इंदापुरात स्वच्छता अभियान जनजागृती

रेडा – आपला परिसर स्वच्छ राखला पाहिजे. स्वच्छतेमुळे आरोग्य चांगले राहते तसेच आरोग्यपूर्ण वातावरणात अभ्यास सुद्धा चांगला होतो. स्वच्छताप्रिय आपली वर्तणूक असली पाहिजे. शरीर आणि मन एकमेकांना जोडलेले असते. संसर्गजन्य आजारापासून आपले संरक्षण होण्यासाठी आपण स्वच्छतेला अधिक महत्त्व दिले पाहिजे, असे मत इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकीता शहा यांनी व्यक्‍त केले.
इंदापूर नगरपरिषद आणि इंदापूर महाविद्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने इंदापूर महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वच्छता अभियान जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्षा शहा बोलत होत्या. यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, प्रा. अशोक पाटील, डॉ. शिवाजी वीर, प्रा. बाळासाहेब काळे उपस्थित होते.
अंकीता शहा म्हणाल्या की, इंदापूर नगरपरिषदेला आपण सहकार्य करून आपले शहर स्वच्छ व हरित करून देशपातळीवरील स्पर्धेत रॅंकिंगमध्ये दहाच्या आत येण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. तर स्वच्छता ऍप व स्वच्छता मंच डाऊनलोड करून आपण स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले. दरम्यान, मुकुंद शहा यांनी उपस्थितांसह विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गौतम यादव, सूत्रसंचालन प्रा. फिरोज शेख तर डॉ. भरत भुजबळ यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)