स्वच्छतेचा प्रश्‍न ऐरणीवर

पाचवडसह परिसरातील परिस्थिती, आरोग्याचा प्रश्‍न गंभीर

पाचवड – वाई तालुक्‍यातील पाचवडसह परिसरात स्वच्छतेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. वाई-पाचवड रोडवर असलेल्या एका ओढ्यालगत व्यापाऱ्यासह नागरिकांमधून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दरम्यान, दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाचवड हे वाई तालुक्‍यातील महत्वाचे असे बाजारपेठेचे ठिकाण आहे. महामार्गाला लागून ही बाजारपेठ असल्यामुळे याठिकाणी वाईसह जावली, कोरेगाव, खंडाळा, महाबळेश्‍वर तालुक्‍यातून व्यापारी, शेतकरी येत असतात.
मंगळवार हा पाचवडच्या आठवडी बाजाराचा दिवस असल्याने बाजार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाजाराच्या परिसरात व्यापारी, शेतकरी शिल्लक माल अनेकवेळा तसाच टाकत असतात. याशिवाय पाचवड येथे रुग्णालयांची संख्याची अधिक आहे.

या रुग्णालयातून वेस्टज गोष्टींचा कचराही प्रचंड असतो. हा कचरा वाई-पाचवड रोडवरील ओढ्यात टाकला जातो. या ओढ्या नजीक अनेक दुकाने आहेत. याठिकाणी नियमित नागरिकांची गर्दी असते. या कचऱ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍नही गंभीर होत चालला आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाकडूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)