स्वच्छता व वृक्षारोपणाने श्रद्धांजली

निगडी – येथील रूपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष कै. बाजीराव गारगोटे यांना त्यांच्या सहकारी व कुटुंबीयांनी खूपच आगळ्या-वेगळ्या श्रद्धांजली अर्पित केली. त्यांच्या मूळ गावी जाऊन स्वच्छता अभियान राबवण्यात आले आणि स्वदेशी उपयोगी रोपांची लागवड करण्यात आली. कै. बाजीराव गारगोटे यांनी रूपीनगर शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेमध्ये अध्यक्ष, सचिव, समन्वय समिती अध्यक्ष अशी विविध पदे भूषवून संस्थेला व संस्थेच्या सर्व शाखांच्या शाळा नावारूपाला आणल्या. त्यांना स्छच्छतेची व पर्यारणाची खूप आवड होती. त्या निमित्ताने गारगोटे यांच्या मूळ गावी वाकी येथे गावठाण, धार्मिक मंदिरे, वैकुंठ स्मशानभूमी इ. ठिकाणचा परिसर स्वच्छ केला. येथील वैकुंठ स्मशान भूमीमध्ये जडीबुटी औषधी वनस्पतीची लागवड करण्यात आली. त्याच बरोबर पिंपळ, चिंच, बेल, कवट, अर्जुन, आवळा, कोरफड इ. वृक्षांची लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमामध्ये आनंदराव गारगोटे, साहेबराव गारगोटे. विशाल गारगोटे प्रा. सुनिल गारगोटे, कृष्णदेव मोहिते, सचिन गारगोटे, संकेत गारगोटे, आशिष मोहिते, शुभम गारगोटे, नितीन गारगोटे, सुभाष गारगोटे, धर्मा नवले, अक्षय मोहिते यांनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)