स्वच्छता पंधरवडा अन्‌ वृक्षारोपनाची मुहूर्तमेढ

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – पुणे जिल्हाधिकारी कार्यालय (खनिकर्म शाखा) व मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघ यांच्या संयुक्‍तपणे स्वच्छता पंधरवाडा आयोजित करण्यात आले. या स्वच्छता पंधरवाड्याचे उद्‌घाटन शनिवारी (दि. 30) रोजी मंगरूळ (ता. मावळ) येथील काकडे स्टोन क्रशर येथे पुणे जिल्हा खनिकर्म अधिकारी सुयोग जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघाचे संस्थापक रामदास काकडे होते. सुयोग जगताप यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. जगताप यांनी खाण व क्रशर उद्योगाच्या परिसराची पाहणी करून स्वच्छता पंधरवाड्यात वृक्षारोपन व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या.

या वेळी मावळ तालुका खाण व क्रशर उद्योजक संघाचे अध्यक्ष विलास काळोखे, उपाध्यक्ष सागर पवार, उद्योजक किरण काकडे, सुधाकर शेळके, श्रीकांत वायकर, संदीप काळोखे, विक्रम काकडे, विक्रम कलावडे, संदीप घोलप, गोरख शेटे तसेच बहुसंख्य खाण व क्रशर उद्योजक उपस्थित होते.

प्रास्ताविकात विलास काळोखे म्हणाले की, मावळ तालुक्‍यातील खाण व क्रशरचा परिसर हा स्वच्छतेच्या मानांकनात आदर्श मॉडेल ठरणार आहे. खाण व क्रशर उद्योजकांनी सामाजिक बांधिलकी जपण्याबरोबरच पर्यावरण जनजागृतीचे कार्य कायम करत आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत एक कदम स्वच्छता की ओर स्वच्छ व सुंदर भारत निर्माण करण्यासाठी मावळ तालुका स्टोन व क्रशर उद्योजक संघ अग्रेसर राहणार आहेत.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)