स्वच्छता ऍपकडे नागरिकांची पाठ ; क्‍यूसीआय’चा निष्कर्ष

नगर: उघड्यावर पसरलेली अस्वच्छता, केरकचरा दूर करण्याच्या उद्देशातून केंद्र शासनाने “स्वच्छ भारत’ अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण-2018 चा प्रारंभ केला होता. यामध्ये राज्यातील महापालिका, नगरपालिका तसेच नगरपालिकांमध्ये “स्वच्छता ऍप’च्या माध्यमातून नागरिकांना उघड्यावर साचलेल्या अस्वच्छतेबाबत ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध होती. स्वच्छता ऍपचा वापर कसा करायचा, याची जनजागृती करण्यात स्वायत्त संस्था कुचकामी ठरल्यामुळे या ऍपच्या वापराकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचा निष्कर्ष केंद्राच्या क्‍यूसीआय (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया) ने काढल्याची माहिती आहे.

युती सरकारने स्वच्छ महाराष्ट्र अभियानची सुरुवात केली. सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासोबतच त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नागरी स्वायत्त संस्थांवर सोपविण्यात आली. स्वायत्त संस्थांच्या कामकाजाचे मूल्यमापन करून त्याआधारे गुणांकन देण्यासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2018चा प्रारंभ करण्यात आला. त्यामध्ये “स्वच्छता ऍप’चा वापर करून उघड्यावरील कचरा, घाण स्वच्छ करण्यासंदर्भात ऑनलाइन तक्रार करण्याचा समावेश होता. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर स्वायत्त संस्थांनी तक्रारींचा तातडीने निपटारा करून तशी नोंद स्वच्छता ऍपवर अपलोड करणे बंधनकारक होते. महापालिकासह नगरपालिका स्वच्छता ऍपच्या मुद्यावर जनजागृती करण्यात कुचकामी ठरल्याचा परिणाम समोर आला. या ऍपकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने क्‍युसीआय’ने केलेल्या सर्वेक्षणात स्वच्छता ऍपवर आधारित 27 महापालिकांसह नगर पालिकांचे रॅंकिंग
घसरल्याचे समोर आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“मिशन मोड’ने कामकाज

राज्यात स्वच्छ सर्वेक्षण-2018 ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता स्वच्छ सर्वेक्षण-2019 अंतर्गत क्‍यूसीआय (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया) मार्फत सर्वेक्षणाची अंमलबजाणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)