स्वच्छता उपविधीचा पुणे पॅटर्न राज्यात

राज्य शासनाने मागविल्या हरकती आणि सूचना

पुणे – शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेने तयार केलेली सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य उपविधी आता संपूर्ण राज्यासाठी राबविली जाणार आहे. महापालिकेने शासनाला सादर केलेल्या या उपविधीचा आधार घेत शासनाकडून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना ती लागू करण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाने ही उपविधी राजपत्रात प्रसिद्ध केली असून त्यावर शासनाने हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी 3 जानेवारी ही अंतिम मुदत आहे. शासनाच्या या उपविधीत कचरा व्यवस्थापनासाठीचे युजर चार्जेसही असणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही वर्षांत पुणे शहरातील कचरा कोंडी गंभीर बनली आहे. त्यामुळे पालिकेचा कचरा डेपो असलेल्या उरूळी देवाची आणि फुरसुंगी गावातील नागरिकांकडून वारंवार कचरा बंद आंदोलन केले जात होते. 2017 मध्ये ग्रामस्थांनी सुमारे महिनाभर आंदोलन केले होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लक्ष घातले. महापालिकेने अल्पकालीन, दिर्घकालीन तसेच प्रदिर्घ कालीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात महापालिकेने शहर स्वच्छतेसाठी कडक पावले उचलून रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणे, ड्रेनेजचे पाणी सोडणे, अस्वच्छता पसरविणे अशा वेगवेगळ्या घटकांसाठी घरगूती तसेच व्यावसायिक अस्थापनांसाठी स्वतंत्र दंडाची तरतूद प्रस्तावित केली आहे. शासनाने ही उपविधी स्विकारताना फक्त ही दंडाची रक्‍कम कमी केली असून पालिकेची उपविधीच जाहीर केली आहे.

युजर चार्जेसचाही समावेश
महापालिकेला दरवर्षी शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी सुमारे 400 कोटींचा खर्च केला जातो. तर करातून व्यवस्थापनासाठी अवघा 200 कोटींचा कर जमा केला जातो. त्यामुळे खर्चाची तूट भरून काढण्यासाठी पुणे महापालिकेने मिळकतकर युजर चार्जेस प्रस्तावित केले आहेत. मात्र, हा प्रस्ताव पक्षनेत्यांच्या बैठकीत मान्यतेसाठी आहे. तसेच त्यास विरोधही होत आहे. मात्र, आता राज्य शासनाच्या उपविधीत या युजर चार्जेसचा समावेश करण्यात आला असून ते संपूर्ण राज्यासाठीच लागू असणार आहेत. त्यामुळे महापालिकेने ठेवलेला प्रस्ताव नावालाच उरणार असून शासनाकडूनच त्यास मान्यता मिळाल्यास पालिकेस वेगळी मान्यता घ्यावी लागणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)