स्वच्छता आणि पर्यावरणाचा जागर

उरुळी कांचन – उरुळी कांचन गाव हे आता गाव राहिले नसून शहरीकरण झाले आहे. खूप मोठ्या प्रमाणात कामानिमित्त व छोटे उद्योग व्यवसाय निमित्त शहराकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन कर्मचारी काम करत असताना ताण येत आहे. तरी ज्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत त्या देण्याच्या संदर्भात प्रशासन वर्गास कसरत करावी लागत आहे. आपला परिसर-माझा परिसर स्वच्छ परिसर व माझी जबाबदारी सामूहिक प्रयत्न विचार महत्त्वाचे आहे. उरुळी कांचन येथील स्वच्छता अभियान गुप्रच्या माध्यमातून दर रविवारी पहाटे सहा ते साडेसात तसेच ाठ या वेळेत गावातील विविध ठिकाणचा परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंदिर स्चछ करण्याचा परिसरात झाडे लावून पाणी घालणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. या गुपमध्ये अनेक सुशिक्षित तरुण सामाजिक कार्याची अवड असणारी निरपेक्षपणे काम करणारे तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला जात आहे. पर्यावरण संरक्षणाच्या निमित्ताने सर्वाजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संरक्षण वाढसंदर्भात सातत्याने पाणी वगैरे काळजी घेतली जात आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आगमन झाल्यानंतर होणाऱ्या परिसरातील कचरा हा दोन तासांत शिस्तबद्ध पध्दतीने साफसफाई केली जात आहे. प्लॅस्टिक बंदीसंदर्भात गुप्रच्या व ग्रामपंचायत माध्यमातून सर्वात प्रथम निर्णय उरुळी कांचन येथील ग्रामस्वच्छता अभियानने घेतला. त्या पद्धतीने जनजागृती केली. पण लोकांची मानसिकता बदलणे कठीण होत आहे. या गुप्रचे सर्वस्तरावर कौतुक केले जात आहे. या गुप्रचा आदर्श घेऊन पूर्व भागातील काही गावांमध्ये तरुणवर्ग एकत्रित घेऊन सामूहिकरीत्या साफसफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. वैशिष्ट्य म्हणजे सफाई झाल्यावर ज्या भागाची सफाई करतात. तेथील मंदिराचा छायाचित्र घेतात. यामध्ये कोणीही अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव नाहीत. ते काम केल्यावर आम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करित नाही, असे सांगतात.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)