स्वच्छता अभियान कागदावर राबून नका

फलटण पालिकेत विरोधकांनी घेतला समाचार : विशेष सभेत 11 विषयांना मंजूरी

फलटण – स्वच्छता अभियान फक्त कागदावर न राबवता फलटणकरांना सुविधा पुरवा, अशी मागणी फलटण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी विशेष सर्वसाधारण सभेत केली. दरम्यान, स्वच्छ भारत अभियान व श्रीराम रथयात्रेनिमित्त करावयाच्या कामांसह विविध विषयावरही चर्चा झाली.

फलटण नगरपालिकेची 12 विषयांसाठी बोलवलेली विशेष सभा 1 विषय तहकुब ठेवत 11 विषयांना मंजुरी देत पार पडली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. निता नेवसे होत्या. मुख्यधिकारी प्रसाद काटकर, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, अशोकराव जाधव, अजय माळवे, सचिन बेडके, विक्रम जाधव, अनुप शहा, सचिन अहीवळे, वैशाली अहिवळे, मधुबाला भोसले, ज्योती खरात आदी नगरसेवक उपस्थित होते.

सभेमध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बागेमध्ये कचऱ्याचे कंपोस्ट खत करण्याच्या विषयावर चर्चा झाली. यावेळी नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आधी बागा दाखवा, मग खत तयार करा असा सवाल केला. त्यावर नगराध्यक्षांनी बागा आहेत असे सांगताच लोकसंख्येच्या प्रमाणात किती बागा आहेत व किती पाहिजेत असा सवाल समशेरसिंह यांनी केला. अभियानावर खर्च करण्यापेक्षा या सुविधाकडे लक्ष दिले तर नागरिक समाधानी होतील, स्वच्छ भारत अभियान फक्त कागदावर गुणापुरते न राबविता प्रत्यक्ष अंमलबजावणी करा. नंबर 1 येण्यापेक्षा फलटणकर नागरीकांना सुविधा पुरवा, असा टोला समशेरसिंह यांनी लगावला. यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर रथमार्गावरील खड्डे डांबरांनी बुजवण्याच्या सुचना समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी केल्या. प्रारंभी महात्मा फुले यांच्या पुण्यातिथीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात
आले.

कमिन्सबाबत मुख्यधिकाऱ्यांची नाराजी
स्वच्छ भारत अभियानात फलटण शहरात स्वच्छतेबाबत गाजावाजा करत कमिन्सने सहभाग घेतला. त्यांनी काय काम केले हे सभागृहापुढे मांडा. फक्त शहराला लेबल लावण्यासाठी कमिन्सचा सहभाग आहे का असा सवाल समशेरसिंहांनी केला. यावर मुख्यधिकारी यांनीही कमिन्सच्या कामावर समाधानी नसल्याचे सांगितले. कंमिन्सची काम कमी आणि प्रसिध्दीच जास्त ही पध्दती असल्याची चर्चा सभागृहात होती.

तीन वर्ष राहुद्यात : मुख्यधिकारी
मुख्यधिकारी प्रसाद काटकर यांनी फलटण नगरपरिषदेचा कार्यभार स्वीकारून 1 महिना झाला. त्यांची पहिलीच सभा असल्याने सदस्यांच्यावतीने नगराध्यक्षांनी स्वागत केले. यावेळी मुख्यधिकाऱ्यांनी 3 वर्ष राहुद्यात अशी कोपरखळी मारली. यावर समशेरसिंहानी रहा, पण वाघ बनून रहा, असे सांगितले. यावर सर्वाना बरोबर घेवून व सकारात्मक काम करू. यापुर्वी या जिल्हयात काम केले असल्याने या भागाची व समस्यांची माहिती असल्याचे काटकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)