स्वच्छता अभियान अंतर्गत देहूरोड कॅंटोन्मेंट व लायन्स क्‍लबच्या वतीने वृक्षारोपण

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे आवश्‍यक- एल. के. पेंगू

देहुरोड – पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, वाढत्या संकटांना तोंड देणे भाग पडत असून, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन दक्षिण विभाग रक्षा संपदा विभागाचे प्रधान संचालक एल. के. पेगू यांनी देहुरोड, शितळानगर येथे केले.

कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत वॉर्ड क्रमांक एक (थॉमस कॉलनी व बाह्यवळण महामार्ग) परिसरात कॅंटोन्मेंट बोर्ड व देहूरोड लायन्स क्‍लब यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. बोर्ड अध्यक्ष ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, नगरसेवक रघूवीर शेलार, लायन्स क्‍लबचे अध्यक्ष अवतारसिंग कांद्रा, मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष उद्धव शेलार, नरेंद्र महाजनी, मनोज वाखारे, विलास शिंदे, दिलीप शेलार, राजेश मुऱ्हे, राजेश मांढरे आदी तसेच कॅंटोन्मेंटचे कर्मचारी, लायन्स क्‍लब स्कूल व महात्मा फुले प्राथमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

बोर्ड सदस्य शेलार यांनी प्रास्ताविकात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्याचा हेतू मांडला. सीईओ सानप, नरवाल यांनी मनोगत व्यक्‍त केले. बोर्ड अध्यक्ष वैष्णव यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व मांडले.
निशांत शेख यांनी सूत्रसंचालन केले. आरोग्य निरीक्षक किरण गोंटे यांनी आभार मानले.

देहूरोड विकास समितीची निषेधपर घोषणाबाजी
वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रधान संचालक उपस्थित असताना बोर्ड सदस्य रघुवीर शेलार वगळता कॅंटोन्मेंटच्या उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे यांच्यासह सर्व सदस्य यावेळी अनुपस्थित होते. तसेच विकासकामे करण्यास निधी नसल्याचे कारण पुढे करण्यात येत असताना मंडप आदी अनावश्‍यक खर्च कऱण्यात येत असल्याबद्दल समितीचे सोलोमन भंडारी, राजु मारीमुत्तू यांनी काळे झेंडे दाखवून निषेधाच्या घोषणाबाजी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)