स्वच्छतागृह चालकाकडुन प्रवाशांची लूट

प्रसाधनगृहाचे दर फलकावर नावालाच; आगारप्रमुखांचे दुर्लक्ष 
बसस्थानकात नवीन स्वच्छतागृह बांधण्यासाठी सोलापूर येथील एका ठेकेदाराला देण्यात आले आहे. मात्र, संबंधीत ठेकेदाराने आठ वर्षापासून बांधकाम न केल्याने त्या ठेकेदाराच्या परवाना दोन महिन्यापूर्वी नगर विभागीय कार्यालयाने रद्द केला होता. ठेकेदार न्यायालयात जावून स्थगिती आदेश आणल्याने गेल्या आठ वर्षापासून स्वच्छतागृहाचे बांधकाम रखडले आहे.
जामखेड: चार जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या जामखेड बसस्थानकातील स्वच्छतागृहात प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. बस स्थानकाच्या वतीने दोन रुपये शुल्क असलेला फलकही या ठिकाणी लावण्यात आलेला असतानाही प्रवाशांकडून प्रसाधन गृहासाठी 7 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे अशा प्रकारे लूट सुरू असूनही याकडे आगारप्रमुखाकडून दुर्लक्ष केले जाते आहे.
जामखेड आगारातुन नाशिक, पुणे, मुंबई, उस्मानाबाद, कोल्हापूर, बीड, लातूर, नगर आदी जिल्ह्यांसाठी बससेवा दिली जात असून, गर्दीच्या काळात दिवसाला किमान 15 ते 20 हजार प्रवासी येथून ये-जा करतात. त्यातील महिलांची लक्षणीय संख्या पाहता त्यांच्यासाठी येथे पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे नाहीत. जे स्वच्छतागृह आहे, ते देखील अस्वच्छ असते. विशेष म्हणजे कोणत्याही सोयी-सुविधा दिल्या जात नसतानाही. अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन लूट केली जात आहे. येथील स्वच्छतागृहातील पाण्याचे पाइप फुटलेले असून, छतदेखील गळके आहे. येथे पाण्याची कोणतेही सोय नसल्याने विकतचे पाणी घ्यावे लागते. शौचालयात स्वतंत्र नळ नाहीत.
स्वच्छतागृह चालक प्रवाशांकडून जादा पैसे घेत असेल, तर त्यांनी आमच्याकडे लेखी तक्रार करावी, आम्ही कारवाई करू 
-महादेव शिरसाठ 
आगारप्रमुख, जामखेड 
आतील हौदातूनच प्रवाशांना स्वतःच्या हाताने पाणी घ्यावे लागते. स्वच्छतागृहाच्या वापरासाठी ठेकेदारांकडून जादा पैसे घेतले जातात. स्वच्छतागृहाच्या बाजूलाच बसस्थानकाच्या वतीने सुलभ शौचलयाचा फलकही लावण्यात आला. यावर पुरुषांसाठी प्रसाधन गृहासाठी 2 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे असे लिहीलेले असताना संबंधित ठेकेदाराकडून 7 रुपये शुल्क आकारण्यात येते याबाबत प्रवाशांनी आवाज उठवल्यास दमदाटी केली जाते पैसे मोजूनही सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांकडून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची बसस्थानकावर होणारी लूट कधी थांबेल हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)