स्वच्छतागृहे वापरण्या लायकीचेच नाही

जळोची- “स्वच्छ आणि सुंदर शहर’, “स्वच्छ भारत अभियान’, “महाराष्ट्र स्वच्छता अभियान’ या सारख्या अनेक योजना बारामतीत राबविण्यात आल्या व त्याकरिता खर्च देखील पालिकेने केला; पंरतु सर्व सामान्यांन नागरिकांना स्वच्छतागृहाचा प्रश्‍न बारामती शहरात मोठ्या प्रमाणात भेडसवत असून त्यांची दयनीय अवस्था झाली असून ती वापरण्या लायकीचीच राहिलेली नाही. तरी शहरातील स्वच्छतेच्या या मूलभूत प्रश्‍नाकडे व समस्येकडे दुर्लक्ष का केला जाते असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पहिलेच बारामती परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची आधीच वानवा आहे. जे आहेत त्यांची अवस्था दयनीय आहे. साफसफाई, देखभाल होत नसल्याने त्यांचा वापर करतांना नागरिक त्रस्त होत आहेत.
बारामती शहरातील ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या सिद्धेश्‍वर मंदिरालगत व जुनी भाजी मंडई व शारदा प्रांगण याचबरोबर शहरातील सर्वच ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. तसेच बारामती शहर कचरा मुक्‍त शहर म्हणून नगरपालिकेने घोषित केले असले, तरी शहरात ठिकठिकाणी स्वच्छतागृहासमोरच कचऱ्याचे ढिग साचले आहेत. यामुळे “स्वच्छ सुंदर हरित बारामती’च्या ब्रीद वाक्‍याला तडा गेल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. तरी नगरपालिकेच्या आरोग्या विभागाने यांची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करुन सार्वजिनक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उभारला पाहिजे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्‍त होत आहे.
मागील अनेक दिवसांपासून स्वच्छतागृहात पाणीपुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे येथे दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर पसरलेली असते. शहरात लाखो रुपये खर्च करुन ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत मात्र, शहरातील अनेक स्वच्छतागृहे तर पाय ठेवण्याच्या देखील लायकीचे नाहीत. तर काही स्वच्छतागृहांमध्ये जाताना नाकाला रुमाल लावून जावे लागत आहे. तरी नगरपालिकेने आवश्‍यकत्या ठिकाणी नव्याने स्वच्छतागृहांची उभारणी करीत आहेत किमान त्या स्वच्छतागृहात तरी नियमित स्वच्छता करुन सर्व सोयीकरुन पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. शहरात ठिकठिकाणी नागरिकांची कुचंबणा होत आहे. शौचालयाची दुरवस्था होत चालली आहे. संख्या देखील कमी आहे. बऱ्याचदा बाहेरच कुठेतरी आडोसा शोधावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

  • पाण्याची सोय नाही
    शहरातील बरऱ्याच स्वच्छतागृहामध्ये पाणी नसल्यास गैरसोय होते. जे पाणी आहे ते वापरण्यालायीकीचे नाही. शौचालयातील टॉयलेटला स्वतंत्र नळ नाहीत, तर पॅसेजमध्ये ठेवलेल्या हौदातूनच नागरिकांना स्वतःच्या हाताने बादलीने पाणी घ्यावे लागते. त्यातच या स्वच्छतागृहांमध्ये दुर्गंधी व डासांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अनेक आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
  • स्वच्छतागृहांमध्ये अतिशय दुर्गंधी झाली आहे. पाण्याचा व्यवस्था आहे. पण नावालाच आहे. जे पाणी आहे. ते वापरण्या लाईकच नाही. लवकरात नगरपालिका प्रशासनाने याबाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
    – निलेश जगताप, नागरिक
  • स्वच्छतागृहाची स्वच्छता नियमित केली जाते. नागरिक त्यांचा वापर योग्य करीत नाही. शहरातील सर्वच स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्यात येईल.
    – रवींद्र सोनवणे, आरोग्य निरीक्षक, नगरपालिका बारामती

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)