“स्वच्छ’चे पहिल्यांदाच “पेपरलेस’ सर्वेक्षण

पिंपरी – केंद्र शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरूवात करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण 4 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. यामध्ये थेट केंद्राचे पथक अचानक शहरात येऊन पाहणी करणार असून यंदाचे सर्वेक्षण हे “पेपरलेस’ होणार आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान स्वच्छ सर्वेक्षण 2019 करिता पिंपरी-चिंचवड महापालिका सज्ज झाली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरांचे सर्वेक्षण केले जाते. शहरांचा गुणानुक्रम निश्‍चित करण्यासाठी संकलीत केलेल्या माहितीचे स्वच्छ सर्वेक्षण 2019 मुल्यांकनासाठी पाच हजार गुणांची प्रश्नावली आहे. त्याचे विभाजन चार भागात केलेले आहे. यास प्रत्येकी 1250 याप्रमाणे गुणांक आहेत. महापालिकेकडून प्राप्त झालेली ऑनलाईन माहिती, कचरा मुक्त शहरांसाठी प्रमाणपत्रे (स्टार रेटींग) आणि ओपन डेफिकेशन फ्री सिटीज (ओडीएफ), प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे प्राप्त झालेली माहिती. नागरिकांच्या प्रतिसादाद्वारे अभिप्रायान्वये प्राप्त झालेली माहितीलाही गुण मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबतची सर्व तयारी महापालिकेने केली आहे, असे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले.
गृहनिर्माण सोसायटी, हॉटेल, रुग्णालय, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, सेवाभावी संस्था, बचतगट, स्वयंसेवी संस्था, नागरिक, मनपाचे सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना स्वच्छता मोहिमेत सहभागी करुन घेतले आहे. चिंचवड शहरास या सर्वेक्षणात चांगला गुणानुक्रमांक मिळावा, असा निर्धार महापालिकेने केला आहे. यासाठी मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर राहुल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला आहे.

कसे असेल सर्वेक्षण?
स्वच्छ सर्वेक्षण होणार “पेपरलेस’ होणार असून शंभर टक्के कचरा निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरणावर भर असणार आहे. तसेच “स्टार रेटिंग प्रोटोकॉल’ची अंमलबजावणी सुनिश्‍चित केली जाणार आहे. सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती व स्वच्छता याचे “स्वच्छ भारत ऍप्स’लाही गुण दिले जाणार आहेत. नागरिकांच्या सहभागाकरीता स्वच्छ भारत मंचाची निर्मिती करुन नागरिक त्यांच्या वैयक्तिक नवकल्पना यामध्ये समाविष्ट करू शकतात. तसेच घरगुती खत निर्मिती याचा उपविधीमध्ये स्वच्छता सेवास्तराचा समावेश केला जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)