स्वखर्चातून केली गावासाठी पाण्याची सोय

माळशिरस- माळशिरस गावाची यात्रा दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना कडाक्‍याच्या उन्हाळ्यामुळे भूजल पातळी खालावली गेल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न समोर आला होता. मात्र माळशिरस गावाचे विद्यमान उपसरपंच निलेश गाडेकर यांनी पुरंदर उपसा योजनेच्या माध्यमातून गावासाठी स्वखर्चातून पाण्याची सोय केली. माळशिरस येथे पुरंदर उपस्याचे पाणी सोडल्यानंतर विद्यमान उपसरपंच निलेश गाडेकर, माजी उपसरपंच हिरालाल यादव, सामाजिक कार्यकर्ते सुनील यादव यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी पुरंदर उपसा सिंचन योजनेचे सहायक अभियंता श्रेणी 2 सुहास सकपाळ, अभियांत्रिकी सहायक औदुंबर महाडिक, अविनाश जगताप, गणेश आंबले, किरण आंबले, दशरथ यादव, रमेश जाधव, आकाश वाघले, आजम शेख, गणेश गावडे, विजय काळभोर, नितीन यादव, किरण भिसे, महेश कामठे, गणेश यादव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांना पुरंदर उपसाचे पाणी हवे आहे. त्यांनी रीतसर पाणी मागणी अर्ज भरून सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी पुरंदर उपसा सिंचन योजनेचे सहायक अभियंता सकपाळ यांनी केले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)