स्वःकल्पनेतून केल्या शाळेच्या भिंती बोलक्‍या

पिंपरी – चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी स्वतः रंग व कुंचल्याच्या साह्याने शाळेच्या भिंत बोलक्‍या केल्या.

भिंतीवर प्रत्यय लावून शब्द बनवा, औषधी वनस्पतींची नावे सांगणारे झाड, इंग्रजी अल्फाबेटस्‌ शिकविणारा छोटा भीम, रोमन अंक, मापन, अपूर्णांक, पर्यावरणाचा संदेश देणारी मुले, इंग्रजी मराठी महिने, रंगांचे स्पेलिंग, पाढे, असे अभ्यासातील घटक इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी रंगविले. त्याचबरोबर वारली पेंटिंगही रेखाटण्यात आले. स्वतःच्या हाताचा ठसा भिंतीवर उमटवताना ही माझीच शाळा आहे या प्रेमळ अधिकारावर जणू शिक्कामोर्तबच केल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

शाळेच्या भिंतीवर शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनशीलतेचे रंग भरले व ज्ञानरचनावादी शिक्षणाची अनुभूती घेतली. श्वेता शेळवणे, वैष्णवी रसाळे, प्रीती वीर, वैष्णवी केसरकर, मोनिका दुधाने, आदित्य सोनावणे, भीमाशंकर जिरगे, मगर, आकांक्षा सुपेकर या विद्यार्थ्यांबरोबरच सरला पाटील, माधुरी कुलकर्णी, वीणा तांबे, प्रमोदिनी बकरे, स्मिता जोशी, गणेश शिंदे यांनी शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. मुख्याध्यापिका वासंती तिकोने यांनी संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)