स्वंयसेवकांनी बांधला सिमेंट कॉंक्रीटचा बंधारा बांधला

दातखिळवाडीत “रासेयो’चे सात दिवसीय निवासी शिबिर

जुन्नर- शिवछत्रपती महाविद्यालय, जुन्नर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दातखिळवाडी (ता. जुन्नर) येथे सात दिवसांचे निवासी शिबिर आयोजित करण्यात होते.
या शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत स्वंयसेवकांनी 29 फूट लांब, 3 फूट रुंद व पायासह 6 फूट उंच असा सिमेंट कॉंक्रिटचा बंधारा बांधला. गटविकास अधिकारी विकास दागंट यांनी या बंधाऱ्याला भेट दिली. यबरोबरच परिसरात विविध विकासकामे करण्या आली. या स्वयंसेवकांनी वनविभाग जुन्नर व वनरक्षक रमेश खरमाळे यांच्यासह जीवधन गडाच्या पायवाटेवरील गवत काढून स्वच्छता केली, तसेच जीवधन परिसरातील समृद्ध जैवविविधतेचा अभ्यास केला.
दातखिळवाडी येथील बसस्थानक, प्राथमिक शाळा, खंडोबा देवस्थान परिसर, रस्ते व इतर सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली. गावाजवळील सिमेंटच्या नाला बांधातील गाळ काढून त्याचे खोलीकरण करण्यात आले आणि गावातील कचरा विघटनासाठी खड्डा तयार करून देण्यात आला.
यावेळी रमेश खरमाळे, ज्ञानेश्वर महाराज वाबळे, राहूल घोलप, डॉ. प्रितमकुमार बेदरकर, डॉ. अमोल पुंडे, सोनाली खरपुडे, पवार महाराज आदी व्याख्यात्यांचे गड स्वच्छता, गड संवर्धन व गिर्यारोहण, ग्रामस्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलनातील युवकांचे योगदान, ग्रामविकास व ग्रामस्थांचा सहभाग, युवकांपुढील आव्हाने व उपाय, जेनेरिक औषधे, वृक्षारोपण व संवर्धन या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन केले होते. शिबिर काळात हुंडाबळी, स्त्री भ्रुण हत्या विरोधी नाटक, स्वच्छ भारत, देशभक्तीचे कार्यक्रम, जात्यावरच्या ओव्या घेण्यात आल्या. स्वयंसेवकांच्या शारीरिक कसरती, व्यायाम, योगासने, प्रार्थना, गटचर्चा, बौद्धिक व शारिरीक खेळांचे आयोजन केले गेले. प्रश्नावलींच्या सहायाने ग्राम सर्वेक्षण करण्यात आले.
शिबिराचे संयोजन दातखिळेवाडीच्या सरपंच रुपाली दातखिळे, उपसरपंच नवनाथ पानसरे, ग्रामसेवक विरेंद्र गवारी, मनोज दातखिळे, जालिंदर दातखिळे, सचिन दातखिळे आणि ग्रामस्थांनी केले. शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक, उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. जोशी, अध्यक्ष प्रतिनिधी व्ही. बी. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी पालकप्रतिनीधी अशोक काळे, खजिनदार कांता मस्करे उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष ऍड. संजय काळे यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)