स्लीम राहण्यासाठी कतरिनाला आवडे वॉटर एरोबिक्‍स

वजन कमी करण्यासाठी जर व्यायाम, डायटिंग, वर्कआऊट करून कंटाळा आला असेल, तर आता कधी तरी वॉटर एरोबिक्‍स करण्याबाबतही विचार करायला हरकत नाही. कारण हा फॉर्म्युला आता स्वतः कतरिना कैफनेच अनुभवातून सिद्ध केला आहे. वॉटर एरोबिक्‍समुळे केवळ स्लीम ट्रीमच नव्हे तर फ्लॅट बेलीपण करता येऊ शकेल. कतरिनाने स्वतः

गेल्या काही वर्षांपासून वॉटर एरोबिक्‍सचे शिक्षण घेतले आहे आणि स्वतःला स्लीम राखण्यासाठी नियमितपणे ती वॉटर एक्‍सर्साईजही करत असते. सर्व वयोगटाच्या व्यक्‍ती या वॉटर एरोबिक्‍सचा आनंद घेऊ शकतात, असे तिनेच म्हटले आहे.
वॉटर एरोबिक्‍स करताना कतरिनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ फिटनेससाठी जागरुक असणाऱ्यांसाठी खूपच प्रेरक ठरू शकतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कतरिनाबाबतची आणखी एक गोष्ट मुद्दाम गंधर्वच्या वाचकांना सांगण्यासारखी आहे. ती म्हणजे कतरिना आता रिलेशनशीपमध्ये आहे. तिने स्वतःच या बातमीला दुजोरा दिला आहे. यापूर्वी सलमान खान आणि रणबीर कपूरबरोबर रिलेशनशीपमध्ये असलेल्या कतरिनाला आता नवीन जोडीदार मिळाला, हे फार छान झाले आहे. सलमान किंवा रणबीरबरोबरच्या अफेअरबाबत ती स्वतः कधीच काही बोलली नव्हती. मात्र यावेळी तिने आपले मौन सोडले आहे. पण हा नशीबवान हिरो आहे तरी कोण, हे मात्र तिने गुलदस्त्यातच ठेवले आहे.

सध्या कतरिना सलमानबरोबर “भारत’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रियांका चोप्राने ऐनवेळी सिनेमा सोडल्यामुळे तिच्या रिप्लेसमेंटमध्ये काम करण्याची संधी कॅटला मिळाली. आतापर्यंत “भारत’च्या युनिटने माल्टातील शुटिंग संपवले आहे. आता आबु धाबीतील शुटिंगसाठी सगळे युनिट रवाना होणार आहे. यावर्षी कतरिनाचे आणखीन दोन सिनेमे रिलीज होणार आहेत. त्यापैकी एक आहे मल्टीस्टारर “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ आणि दुसरा आहे शाहरुख खानचा “झिरो’ दोन्ही मध्ये कतरिनाला मोठ्या अॅक्‍टरबरोबर अभिनयाची जुगलबंदी करायची आहे. हे दोन्ही सिनेमे रिलीज होईपर्यंत कतरिनाच्या नवीन मित्राचे नावही नक्कीच उजेडात आलेले असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)