स्लीप बॉयच्या मनमानीमुळे ऊसतोड लांबली

संग्रहित छायाचित्र

शेतकरी मारू लागलेत गट कार्यालयात हेलपाटे

शिरवळ – खंडाळा तालुक्‍यात विविध गावात ऊस तोडणी सुरू झाली आहे. परंतु, स्लीप बॉयच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असून दररोज गट कार्यालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक, शाररिक त्रास होत असून विनाकारण वेळ वाया जात आहे. तरी संबधित कारखान्याचे अध्यक्ष, संचालक, किंवा कार्यकारी संचालक यांनी लक्ष देऊन सुधारणा करावी. अशी मागणी त्रस्त शेतकऱ्यांमधून होत आहे.

-Ads-

सातारा जिल्ह्यात साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाल्याने खंडाळा तालुक्‍यातील विविध गावात तालुक्‍या बाहेरील अनेक कारखान्याचे ऊसतोड कामगार दाखल झाले. ऊस तोड सुरू झाली. परंतु, शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी जून, जुलै, ऑगष्ट महिन्यात ऊस लागण केली. त्याच बरोबर त्यांनी त्वरित उसाची नोंदही केली. परंतु, त्या शेतकऱ्यांचे ऊस तोडणी मागे ठेवून जे शेतकरी स्लीप बॉयचे पाहूणे आहेत किंवा त्यांची ऊठबस करणाऱ्या शेतकऱ्यांचे ऊस तोडणी सुरू झाली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी अगोदर ऊस लागण केली. त्यांना मात्र उद्या, परवा ऊस टोळी पाठवू अशी आश्वासने देत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अगोदर ऊस लागण केली त्यांना शेतकऱ्यांना वाटत आहे की आपला ऊस लवकर तुटेल परंतू स्लीप बॉयच्या मनमानी कारभारामुळे ऊस तोड लांबली जात आहे. त्यामुळे ऊस तोडणीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी गेली अनेक दिवस ऊसाला पाणी देणे बंद केले आहे. त्यामुळे त्यांचे ऊस वाळून चालला आहे.

परिणामी ऊसाला पाणी नसल्याने ऊसाच्या वजनात घट होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. स्लीप बॉयच्या मनमानी कारभाराला आळा घालून ज्यांनी लवकर लागण केली त्यांचा ऊस वेळेवर तोडणी व्हावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)