“स्लीपर कोच’ला गोवा शासनाचीच ना!

File photo

पुणे-गोवा एसटी सेवा : राष्ट्रीय परवाना आवश्‍यक

पुणे – एसटी महामंडळाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या पुणे-गोवा “स्लीपर कोच’ बसला गोवा शासनाने कोलदांडा घातला आहे. या बससेवेला परवाना देण्यास गोवा शासनाने नकार दिला आहे. “ही बससेवा सुरू करायची असेल, तर राष्ट्रीय परवाना मिळवा आणि मगच सेवा सुरू करा,’ अशा शब्दांत गोवा सरकारने एसटी महामंडळाला सुनावले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महामंडळाने आपल्या ताफ्यात शिवशाही, शिवनेरी, अश्‍वमेध, हिरकणी अशा जागतिक बससेवेच्या दर्जाच्या वातानुकुलित आणि आरामदायी बसेस दाखल केल्या आहेत. पण, खासगी सेवेनुसार “स्लीपर कोच’ सुरू करण्यास महामंडळाला यश आले नव्हते. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते तसेच महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी पुढाकार घेऊन लांब पल्ल्याच्या मार्गावर “स्लीपर कोच’ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार पुणे-गोवा या मार्गासह पुणे-नागपूर, अकोला, चोपडा, नांदेड, कोल्हापूर या मार्गांवर ही बससेवा सुरू करण्यात आली होती. गोवा वगळता अन्य मार्गावर या बससेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून महसुलातही वाढ झाली आहे. मात्र, गोवा मार्गावर ही सेवा सुरू करण्यास गोवा शासनाने “रेड सिग्नल’ दिला आहे. त्यामुळे या मार्गावर “स्लीपर कोच’ची बससेवा सुरू करण्याचे एसटी महामंडळाचे स्वप्न भंगण्याची शक्‍यता आहे.

 पुणे-गोवा मार्गावर “स्लीपर कोच’ सेवा सुरू झाल्यास त्याचा प्रवाशांना फायदाच होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन गोवा शासनाशी पुन्हा संपर्क साधण्यात येणार आहे. त्यासाठी शिष्टमंडळ पाठविण्याची आमची तयारी आहे.
– यामिनी जोशी, विभागीय नियत्रंक, एसटी महामंडळ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)