‘स्मोकिंग कीड’ (प्रभात शॉर्ट फिल्म कॉर्नर)

धूम्रपान मानवाच्या शरीराला हानिकारक आहे. सध्या फॅशन, प्रतिष्ठा किंवा सवय म्हणून अनेकदा कॉलेजचे युवक युवती रस्त्यावर कॉलेजच्या कट्ट्यावर धूम्रपान करताना दिसतात. आपल्या शरीरास धूम्रपान घातक आहे हे माहित असून देखील अनेकजण धूम्रपान करतात. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे असूनही काही लोक सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढताना दिसतात.

धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना कॅन्सरसारख्या आजाराला सामोरे जावे लागते. धूम्रपान करणारी व्यक्ती चैन म्हणून धूम्रपान करत असते परंतु सिगारेट मधून निघणाऱ्या धुरापासून त्या व्यक्तीस जशी बाधा पोहोचते त्याप्रमाणे आजूबाजूच्या लोकांना ही त्या वासानेही त्रास होतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती स्वतःबरोबर दुसऱ्या लोकांना ही आजार बळावण्यास निमंत्रण देत असतात.

धूम्रपान करताना युवावर्ग दिसला की साधारण दुर्लक्ष केले जाते. परंतु, जर लहान मुलांनी मोठ्यांचे अनुकरण करून तसे करायचा प्रयत्न केल्यास मोठ्या व्यक्तींच्या भुवया उंचावल्या शिवाय राहत नाही. लहान मुलांच्या माध्यमातून धूम्रपान शरीरास कसे हानिकारक आहे याची माहिती देणारी नवी लघुकथा आज आपण पाहणार आहोत.

‘स्मोकिंग कीड’ या लघुकथेत रोडवर अनेक नागरिक सिगारेट ओढताना दिसत आहेत. त्यांना पाहून 10 ते 12 वर्षांची लहान मुले हातात सिगारेट घेऊन ती पेटविण्यासाठी लायटर मागण्याकरिता सिगारेट पिणाऱ्या व्यक्तींकडे जातात. लायटर मागतात परंतु मोठ्या व्यक्ती शॉक होऊन त्यांना सिगारेट तू नाही घेऊ शकत ते तुझ्या शरीरास हानिकारक आहे. असे सांगण्याचा प्रयत्न करतात.

तेव्हा ती लहान मुले धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या हातात एक छोटी चिठ्ठी देतात. त्या चिठ्ठीमध्ये ‘You worry about me. But why not about yourself ? असा प्रश्न विचारतात. या प्रश्नातून मुलं असं सुचवतात तुम्ही आमची काळजी करता पण तुम्ही स्वतःची काळजी का करत नाही. लहान मुलांच्या या वाक्‍याने जोरदार चपराक बसली. ती चिठ्ठी वाचून प्रत्येकजण निशब्द होऊन कोणी हातातली सिगारेट टाकून देत, तर कोणी सिगारेट पुन्हा बॉक्‍समध्ये ठेवतात.

लहान मुलाचं बोलणं कधी कधी मोठ्या व्यक्तींना विचार आणि कृती करण्यास भाग पडणारे असते. लहान मुलांच्या बोलण्याने झालेला सकारात्मक परिणाम ही दिसतो. प्रस्तुत लघुकथेमध्ये लहान मुलांचा वापर कलात्मक पद्धतीने करण्यात आला आहे. दीड मिनिटांच्या ‘स्मोकिंग कीड’ या लघुकथेतून लहान मुलांच्या माध्यमातून परिपूर्ण असा सामाजिक संदेश देण्यात आला आहे.

 गायत्री तांदळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
118 :thumbsup:
98 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)