स्मिथ, वॉर्नर वरील बंदी राहणार कायम

file photo..........

मेलबर्न: पुढील महिन्यात भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. तसेच नजीकच्या काळातील ऑस्ट्रेलियाच्या संघाचे खराब प्रदर्शन पाहता या मालिकेत भारतीय संघाची धास्ती घेऊन ऑस्ट्रलियन क्रिकेटर्स असोसिएशनने (एसीए) क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या वरील बंदीची अट शिथिल करून त्यांच्यावरिल बंदी हटवत त्यांना भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीवर उत्तर देताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावरील बंदी कायम राहणार असल्याचे सांगितले आहे.

चेंडू छेडछाड प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रलियाने बंदी घातलेली आहे. त्यात स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर प्रत्येकी एका वर्षांची बंदी आहे तर कॅमेरून बॅनक्रॉफ्ट याच्यावर नऊ महिन्यांची बंदी घातलेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने या खेळाडूंवरील बंदीच्या अटी खूप जाचक असल्याचे सांगत यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या बंदीच्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा अशी मागणी केली होती. परंतु, क्रिकेट ऑस्ट्रलियाचे सचीव डेव्हिड पिव्हर यांनी ती मागणी फेटाळली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बोर्डाने सदर प्रकरणाचा खूप गांभीर्यतेने विचार करून शिक्षेतील अटी लादलेल्या आहेत. त्यामुळे ही शिक्षा कमी केली जाणार नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डचा सचीव या नात्याने मी, दक्षिण अफ्रेकेत झालेल्या सर्व प्रकरणाची जबाबदारी घेतो. त्याचबरोबर मला विश्‍वास आहे, आम्ही या प्रकरणातून मार्ग काढून पुढे वाटचाल करू. त्या प्रकारणानंतर अनेक बऱ्या-वाईट घटना घडल्या. त्यातील काही मैदानावर घडल्या तर काही असोसिएशनमध्ये घडल्या त्यातून आम्ही मार्गक्रमण करत आहोत.

केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॅनक्रॉफ्टने सॅण्डपेपरचा वापर करून चेंडूशी छेडछाड केली होती. त्या प्रकरणी स्मिथ, वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांना दोषी ठरवले गेले होते. 21 नोव्हेंबर पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान क्रिकेट मालिकेस सुरुवात होणार आहे. यात तीन टी-20, चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामणे होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)