स्मिथ, वॉर्नर, बॅंक्रॉफ्ट यांची क्षमायाचना

 स्मिथने स्वीकारली “बॉल टॅम्परिंग’ प्रकरणाची जबाबदारी

सिडनी  – “बॉल टॅम्परिंग’ प्रकरणी दोषी ठरल्यानंतर निलंबित करण्यात आलेला ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट यांनी आपल्या चुकीबद्दल क्षमायाचना केली आहे. निलंबनानंतर मायदेशी परतल्यावर या तिघांनीही वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्या चुकीची कबुली देतानाच क्रिकेटशौकिनांची, तसेच देशवासीयांची क्षमाही मागितली. स्मिथ व बॅंक्रॉफ्ट यांनी या प्रकरणात सहभाग घेतला असला, तरी संपूर्ण कट वॉर्नरनेच रचल्याचेही उघड झाले आहे.

सिडनी विमानतळावरच झालेल्या पत्रकार परिषदेत स्मिथने या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. बॉल टॅम्परिंगचा कट रचताना त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतील, याची मला कल्पनाच आली नव्हती, असे सांगून ही घटना म्हणजे आपल्या नेतृत्वाचे अपयश असल्याची कबुलीही स्मिथने दिली. सगळ्यांना मिळालेला धडा हीच एक या सगळ्यातून निर्माण झालेली एकमेव चांगली बाब असल्याचे सांगून स्मिथ म्हणाला की, माझ्या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी जे काही शक्‍य आहे ते मी करेन. तसेच तुम्ही मला क्षमा केल्यास मी सर्वांचा आदर पुन्हा मिळवेन. या भरगच्च पत्रकार परिषदेत बोलताना स्मिथला अनेकदा अश्रू अनावर झाले होते. त्याचे वडील पीटर स्मिथ यावेळी सोबत होते.

वॉर्नरने सोशल मीडियावरून आपल्या पाठीराख्यांशी संपर्क साधताना सांगितले की, बॉल टॅम्परिंग प्रकरणातील माझ्या भूमिकेबद्दल मला तुमची क्षमा मागितली पाहिजे. बालपणापासून मी ज्या खेळावर अतीव प्रेम केले, त्याच खेळाच्या प्रतिष्ठेला माझ्या चुकीमुळे अखिलाडू कृत्याचा डाग लागावा, याबद्दल मला खरोखरीच वाईट वाटते. बॉल टॅम्परिंग प्रकरणातील माझ्या सहभागाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो आणि माझ्या चुकीबद्दल बिनशर्त दिलगिरी व्यक्‍त करतो. आता मला माझे कुटुंबीय, मित्र, हितचिंतक व सल्लागार यांच्यासोबत काही काळ घालविण्याची इच्छा आहे. त्यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतरच मी माझ्या क्रिकेटमधील भवितव्याबद्दल तुमच्याशी बोलू शकेन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)