स्मिथ आणि वॉर्नरवरील बंदी योग्यच

मुंबई : बॉल टॅम्परिंगप्रकरणी दोषी आढळलेल्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बॅनक्राफ्ट यांच्यावरील एक वर्षाचा बंदीचा निर्णय हा योग्यच असल्याचे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाने स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची बंदी घातली आहे. तर बॅनक्राफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर सचिन तेंडुलकरने ट्वीट करून आपले मत व्यक्त केले आहे. ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखला जातो. हा एक असा खेळ आहे की, जो पारदर्शक पद्धतीने खेळला गेला पाहिजे असे माझे मत आहे. जे काही झालं ते अत्यंत चुकीचं झालं. पण याप्रकरणी जो निर्णय घेण्यात आला आहे तो अतिशय योग्य आहे. विजय हा महत्त्वाचाच असतो. पण तो तुम्ही कशा पद्धतीने मिळवता हे अतिशय महत्त्वाचं असतं.’ असं ट्वीट सचिननं केलं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)