स्मिथ आणि वॉर्नरची आयपीएलमधूनही हकालपट्टी; बीसीसीआयचा निर्णय

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड प्रकरणी ऑस्ट्रेलिया  क्रिकेट बोर्डाने स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची बंदी घातली आहे. त्यातच आता बीसीसीआयनेही दोघांविरुद्ध कडक कारवाई केली आहे. या दोघांना यंदाच्या आयपीएलमध्ये खेळता येणार नाही, असा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांना मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर हे काळे कृत्य करणाऱ्या कॅमेरुन बेनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालती आहे. यापूर्वी आयसीसीने स्मिथवर एका कसोटी सामन्याची बंदी घातली आहे. त्याचबरोबर त्याच्या मानधनातील 100 टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात येणार आहे. आयसीसीने बेनक्रॉफ्टला तीन डिमेरिट गुण दिले आहेत. त्याचबरोबर त्याच्या मानधनातील 75 टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)