स्मार्ट होम्सचे वाढते प्रस्थ (भाग-१)

अलीकडच्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्‍त घर खरेदीकडे कल वाढत चालला आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे आजचा टेक्‍नोसॅव्ही युवक. पूर्वीच्या तुलनेत घर खरेदी करणाऱ्यांच्या आवडीनिवडीत प्रचंड बदल झाला आहे. आतापर्यंत स्मार्ट होम्स केवळ हायएंड तसेच प्रीमियम श्रेणीतील निवासी योजनांतच प्रदान केले जात होते. आता अशा अत्याधुनिक सुविधा अन्य वर्गातील खरेदीदारांसाठीही उपलब्ध करून दिले जात आहे. कारण या वर्गातील खरेदीदारदेखील आपल्या घरात आधुनिक तंत्राची मागणी करत आहेत.

नवीन पिढीला आपले घर अधिकाधिक सुसज्ज आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम हवे आहे. आजची पिढी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूपच पुढे गेलेली असल्याने अशाप्रकारच्या सुसज्ज घरांना मागणी वाढत चालली आहे. हे तंत्रज्ञान कामकाजात मदत करतेच त्याचबरोबर मनोरंजन, शिक्षण, घराची सुरक्षा यासाठी त्याचा लाभ होत आहे. अशा घरात नवीन पिढी ही कोणती ना कोणी स्मार्ट सुविधेची मागणी करतात. स्मार्ट होम्समध्ये ऍक्‍सेट कंट्रोलसारख्या सुविधाही प्रदान केल्या जात आहेत.

-Ads-

स्मार्ट होम्सचे वाढते प्रस्थ (भाग-२)

स्मार्ट होममध्ये राहणाऱ्या नागरिकांना उच्चदर्जाची सुरक्षा व्यवस्था, परवडणारे ऊर्जास्रोत प्रदान केले जाते. विविध उपकरण, प्रकाश, घरातील तापमान, वातानुकुलित यंत्रणा, टीव्ही, संगणक, मनोरंजन अणि सुरक्षा या गोष्टी एकमेकांशी निगडीत असतात. या बाबी घरातील अन्य किंवा कोणत्याही खोलीत बसून उपकरणाच्या मदतीने हाताळता येतात. एवढेच नाही तर आपण घराबाहेर कोठेही असाल तर स्मार्टफोनवर कोणत्याही ऍप्लिकेशन तसेच इंटरनेटच्या मदतीने या गोष्टींना नियंत्रित करता येऊ शकते.

– महेश कोळी

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)