स्मार्ट होम्सचे वाढते प्रस्थ (भाग-२)

स्मार्ट होम्सचे वाढते प्रस्थ (भाग-१)

आजकाल स्मार्ट होम्समध्ये मिळणारे सर्वसाधारण फिचर अॅक्‍सेस कंट्रोलचे आहे. यापुढे एक पाऊल टाकत व्हिडीओ डोअर फोनदेखील आता उपलब्ध होत आहे. या सुविधेनुसार घराची बेल वाजताच आपल्याकडे आलेल्या व्यक्तीचा फोटो काढून ते चित्र मालकाच्या मोबाइलवर पाठवले जाते. याशिवाय लाइव्ह व्हिडीओदेखील पाहावयास मिळतो. यावरून तो व्यक्ती ओळखीचा की अनोळखी आहे, हे समजणे सोपे जाते. ई-मेलच्या माध्यमातून त्याचा फोटो मोबाइलवर पाठवला जातो आणि त्याचे नोटेफिकेशनही फोनवर मिळते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे. आपण घराबाहेर किंवा परगावी असताना आपल्या घरी एखादी अनोळखी व्यक्ती आल्यास त्याची माहिती चटकन समजण्यास मदत मिळते. स्मार्ट उत्पादनाचा घरी वापर केल्याने अनेक प्रकारचे लाभ मिळतात.

-Ads-

विशेष म्हणजे या उत्पादनाला आपल्या गरजेनुसार हाताळू शकतो. म्हणूनच स्मार्ट घरांची मागणी अलीकडच्या काळात वाढलेली दिसून येते. स्मार्ट फोन ऍप्सच्या मदतीने आपण जगभरातून कोणत्याही ठिकाणावरून आपल्या घरावर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. रिअल इस्टेटच्या तज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट होम खरेदी करणाऱ्यांचे वय जर लक्षात घेतले तर त्यात बहुतांश युवापिढीचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, युवा पिढी ही स्मार्ट होमच्या बदल्यात जादा पैसे मोजण्यातही मागेपुढे पाहात नाहीत. स्मार्ट होमचा सर्वाधिक फायदा म्हणजे घर सुरक्षित राहण्याची हमी मिळते. आजकाल बहुतांश नोकरदारांना कामानिमित्ताने देशात-परदेशात फिरावे लागते. अशावेळी घर सुरक्षित ठेवण्यासाठी सध्याच्या प्रचलित व्यवस्था अपुऱ्या असल्याचे निदर्शनास येते. म्हणून स्मार्ट होमच्या मदतीने ही मंडळी घराच्या सुरक्षेबाबत निश्‍चिंत राहतात.

– महेश कोळी

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)