स्मार्ट सिटी साठी 20 हजार कोटी !

मुंबई – पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक बंदी आवश्‍यक असून या निर्णयाला स्थगिती देता येणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी ही मागणी फेटाळली. मात्र, प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी नेमलेली उच्चस्तरीय समिती प्लास्टिक वस्तूच्या उत्पादकांशी चर्चा करून मार्ग काढेल.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राज्यातील आठ शहरात 20 हजार 557 कोटी रुपये खर्चाच्या 285 प्रकल्पांचे काम सुरू असून अन्य शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांचीही कामे हाती घेण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातील 152 शहरांचे 1856 कोटी रुपयांचे घनकचरा प्रकल्प मंजूर केले आहेत. अनेक छोट्या शहरांतील प्रकल्पांतून कंपोस्ट खतनिर्मिती सुरू झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

झिरो माईल होणार पर्यटन स्थळ !
नागपूर येथील झिरो माईल हा देशाचा केंद्रबिंदू आहे. तेथे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षण वाटेल असे पर्यटन स्थळ उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)