“स्मार्ट सिटी’ साठी महापालिकेची मालमत्ता!

सर्वसाधारण सभेपुढे प्रस्ताव : तब्बल 1 हजार 149 कोटींचा खर्च

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात “स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत शहरात विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या इमारती, जागा, शाळा, पथदिवे, चौक, उद्यान आदी मालमत्ताचा वापर केला जाणार आहे. या वापरास परवानगी देण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिका सर्वसाधारण सभा दि. 20 ऑगस्टला आहे. “स्मार्ट सिटी लिमिटेड’च्या वतीने “एरिया डेव्हल्पमेंट’ (एबीडी) आणि “पॅन सिटी’ असे दोन प्रकारे विभागणी करून विकास केला जाणार आहे. त्यामध्ये एकूण 1 हजार 149 कोटी 20 लाख खर्चाचे प्रकल्प व योजनांचा समावेश आहे. “एबीडी’साठी 593 कोटी 67 लाख आणि पॅन सिटीसाठी 555 कोटी 53 लाख रक्कमेच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची “स्मार्ट सिटी’ अभियानात तिसऱ्या टप्प्यात निवड झाली आहे. त्यासाठी एसपीव्ही (विशेष उद्देश वहन) कंपनीची स्थापना 13 जुलैला करण्यात आली. या अभियानासाठी 5 वर्षांसाठी केंद्राकडून 500 कोटी व राज्य शासनाकडून 250 कोटी अनुदान मिळणार आहे. तर, पालिकेचा स्वहिस्सा 250 कोटी आहे. येत्या 5 वर्षांत “स्मार्ट सिटी’तील प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्टे आहे.

“स्मार्ट सिटी’ प्रकल्प राबविताना पालिकेच्या मालकीच्या जागा, रस्ते, उद्याने, पथदिवे, चौक, शाळा, इमारती व इतर मालमत्तांचा वापर करण्यात येणार आहे. त्यास परवानगी मिळावी म्हणून प्रस्ताव 20 ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे. सभेच्या मंजुरीनंतर “स्मार्ट सिटी’चे प्रकल्प व उपक्रमांना सुरूवात केली जाणार आहे.

प्रस्ताव केंद्र शासनाकडे
“स्मार्ट सिटी’ अंतर्गत पुरेसा पाणी पुरवठा, खात्रीशीर वीज पुरवठा, शहर स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, कार्यक्षम शहरी दळणवळण व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सक्षम इंटरनेट सुविधा, शहरी आरोग्य व शिक्षण सुविधा, ई-गर्व्हनन्स, नागरिकांचा सहभाग, शाश्‍वत पर्यावरण, नागरिकांची सुरक्षा व संरक्षण आदी घटकांचा समावेश असलेले महत्त्वाचे प्रकल्प आहेत. हा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे 31 मार्च 1017 रोजी पाठविला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)