स्मार्ट सिटी संचालकांचा बार्सिलोना दौरा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे पदाधिकारी आणि अधिकारी बर्सिलोना देशाच्या दौऱ्याला निघाले आहेत. बर्सिलोना येथे 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या “स्मार्ट सिटी एक्‍स्पो वर्ड कॉंग्रेस 2018′ या परिषदेत सहभागी होणार आहेत. या दौऱ्यासाठी येणाऱ्या 20 लाख 21 हजार रुपये खर्चास स्थायी समितीने मंगळवारी(दि.39) ऐनवेळी मान्यता दिली.
स्मार्ट सिटीचे संचालक असलेले महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते सचिन चिखले, शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे, स्मार्ट सिटी सेलचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण आणि सह शहर अभियंता राजन पाटील यांचा या दौऱ्यात समावेश असणार आहे.

बार्सिलोना येथे 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान “स्मार्ट सिटी एक्‍स्पो वर्ड कॉंग्रेस 2018′ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण “रिप्रेझेंटेटिव्ह स्मार्ट सिटी वर्ल्ड कॉंग्रेस’ यांच्याकडून देण्यात आले आहे. या परिषदेत जगातील शहरांच्या विकासासाठी भविष्यकालीन दृष्टीकोन, ध्येय ठरवून जगातील शहरे विकास करणे. शहर राहण्यायोग्य बनवणे. यावर मंथन होणार आहे. 400 तज्ज्ञ चर्चासत्रे, परिसंवादाच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. त्याचा पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी उपयोग होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यासाठी स्मार्ट सिटीचे पाच संचालक आणि दोन अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 11 ते 17 नोव्हेंबर 2018 दरम्यान बर्सिलोना देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन मे. व्हिजन हॉलिडेज यांच्यामार्फत करण्यात आले आहे. विमानप्रवास, निवास, चहा, नाश्‍ता, भोजन, स्थानिक प्रवास, विमा यासह इतर अनुषंगिक बाबींसह येणाऱ्या 20 लाख 21 हजार रुपये खर्चास स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली.

दौऱ्याच्या खर्चाला मिसाळांचा विरोध
स्थायी समिती सदस्य राजू मिसाळ यांनी स्मार्ट सिटी संचालकांच्या दौऱ्याच्या खर्चास विरोध केला. स्मार्ट सिटीने त्यांच्या निधीतून दौरा करावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, स्मार्ट सिटीच्या संचालकांची तातडीची बैठक घेणे शक्‍य नाही. त्यामुळे स्थायी समोर प्रस्ताव आणला आहे. कोठून तरी पैसे खर्च करायचेच आहेत. स्मार्टचे संचालक देखील आपलेच आहेत. त्यानंतर या दौऱ्याचा खर्च स्मार्ट सिटीच्या बैठकीत मंजूर करुन महापालिका निधीत खर्च करावा, अशा उपसूचनेसह हा विषय मंजूर करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)