स्मार्ट सिटी संचालकांचा बार्सिलोना दौरा रद्द करण्याची मागणी

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी संचालकांचा नियोजित बार्सिलोना दौरा म्हणजे निव्वळ उधळपट्टी असून तो रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी महापौर राहुल जाधव व स्मार्ट सिटी संचालकांकडे केली आहे.

राष्ट्रवादीच्या काळात पदाधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली अनेक देश-विदेशात गेले. त्या वेळचे विरोधी पक्ष भाजपा-शिवसेना दौऱ्यांना विरोध करत व आंदोलने करत. आता भाजपही तोच कित्ता गिरवत आहे. या दौऱ्याला 20 लाख 21 हजार रुपये खर्च होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन वर्षांत भाजप पदाधिकाऱ्यांनी देशातील गुजरात, दिल्ली दौऱ्याबरोबरच एक परदेश दौरा केला होता. या तीनही दौऱ्यांची फलनिष्पत्ती काहीच नाही. आता 11 ते 17 नोव्हेंबरला स्पेन येथील बार्सिलोना दौरा करणार आहेत. सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसे गटनेते सचिन चिखले, शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे, अधिकारी नीलकंठ पोमण, शहर सह अभियंता राजन पाटील दौऱ्यांत आहेत. स्थायी समितीने खर्चाला मान्यता दिली आहे. ही मान्यता घेताना दौऱ्याला जाणारे सर्व पदाधिकारी महापालिकेकडून तात्पुरत्या स्वरुपाचे कर्ज घेत आहेत, असा विचित्र प्रस्ताव मंजूर केला आहे. करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)