स्मार्ट सिटी प्रकल्पात आमचाही विचार करा नं!

बाल हक्क कृती समितीचे महापालिका आयुक्तांना साकडे

पुणे – “स्मार्ट सिटीमध्ये आम्हाला स्मार्ट शाळा, स्मार्ट क्रीडांगणे व मुलांसाठी सुरक्षित वातावरण मिळावे,’ अशा मागण्या बाल हक्क कृती समितीने महापालिका आयुक्तांकडे केल्या आहेत.

-Ads-

जागतिक बाल हक्क दिनानिमित्त बाल हक्क कृती समितीच्या वतीने पुणे महापालिका ते घोलेरोड पर्यंत बाल हक्क यात्रा काढण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष मनीष श्रॉफ, डॉ.विष्णू श्रीमंगले, नैना आठल्ये, ज्योतिका वळे, हरीश वैद्य, सुशांत सोनोने, सोमनाथ खराडे आदी उपस्थित होते.

बाल हक्क कृती समितीने पुणे शहरामधील शाळेंच्या मुलांच्या प्रश्‍नांना अनुसरुन बाल संरक्षण धोरण तयार केले आहे. समितीने हे धोरण महापालिका आयुक्तांकडे सादर केले आहे. मुलांना शाळेमध्ये सुरक्षित वातावरण मिळावे या भावनेतून हे धोरण तयार करण्यात आले आहे. शहरातील बहुसंख्य मुलांची मते, मुलांचे संविधानिक हक्क, मुलांसंदर्भातील विविध कायदे, न्यायालयाने दिलेले मार्गदर्शक तत्वे या गोष्टींचा आधार घेऊनच हे धोरण तयार करण्यात आले आहे.

यावेळी स्मार्ट सिटीमध्ये मुलांसाठी काय स्मार्ट आहे या प्रश्‍नांवर चर्चासत्रही ठेवण्यात आले होते. स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या जनसंपर्क विभागातर्फे संग्राम जगताप यांनी मुलांना स्मार्ट सिटीबाबत माहिती दिली. समितीच्या मुलांनी स्मार्ट सिटीबाबत विविध प्रश्‍नही विचारले. स्मार्ट सिटीमध्ये आम्हाला स्मार्ट शाळा, स्मार्ट क्रीडांगण व सुरक्षित वातावरण हवे आहे, अशा विविध मागण्या केल्या आहेत. तारा मोबाईल क्रेशेस, न्यू व्हिजन, स्वाधार, इंडिया स्पोन्सरशीप कमिटी, सेव द चिल्ड्रन, आयडेंटीटी फाऊंडेशन, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, रेनबो फाऊंडेशन, स्त्री मुक्ती संघटना, उर्मी, आकार, निर्माण या विविध संस्थांनी बाल हक्क यात्रेत व चर्चासत्रात सहभाग घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)