स्मार्ट सिटी प्रकल्पाची “घरोघरी’ जनजागृती

पुणे – स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत स्मार्ट सिटी प्रकल्पांबद्दल जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. बाणेर, औंध, बालेवाडी परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये हा उपक्रम प्राधान्याने राबवण्यात येत आहे.

विकासाच्या विविध संकल्पनांवर नागरिकांसोबत चर्चा घडवून आणणे हा यामागील उद्देश असल्याची माहिती पुणे स्मार्ट सिटी मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी ही माहिती दिली.

औंधमधील सायली गार्डन सोसायटी आणि हर्ष विहार-ब सोसायटीमधून या उपक्रमाच्या पुढील टप्प्याला नुकतीच सुरूवात करण्यात आली. यात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व सहभागी होऊ शकणार आहेत. स्मार्ट सिटीकडून यापूर्वी पावसाळ्यात पर्यावरण संवर्धनासोबतच जनजागृती करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने बीजगोळे निर्मितीचा उपक्रमही राबवण्यात आला होता. “कम्फर्ट झोन’ सोसायटीतून हा उपक्रम सुरू करण्यात आला. शुभारंभावेळी या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सीईओ डॉ. जगताप यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. त्यातील, स्थानिक विकास प्रकल्पांबाबत नागरिकांना त्यांनी माहिती दिली. स्मार्ट सिटीच्या वतीने येत्या काळात होणाऱ्या विकासकामांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे स्मार्ट सिटी मिशनमध्ये थेट नागरिकांचा सहभाग वाढवता येणार आहे. तसेच, नवीन संकल्पना राबवण्यासाठी विविध सूचनांवर विचारविनिमय करण्यात येणार आहे. पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बाणेर, औंध, बालेवाडी या भागात विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्यात आता या अभिनव उपक्रमाची भर पडणार असल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)