“स्मार्ट सिटी’च्या सभेला अध्यक्षांची “दांडी’

पिंपरी – स्मार्ट सिटी संचालकांची बैठक महापालिका भवनातील चौथ्या मजल्यावरील आयुक्त दालनात झाली. यावेळी सदस्यांनी बैठकीचा अंजेडा (विषय पत्रिका) मराठीतच हवा, अशी मागणी केली. या बैठकीला प्रधान सचिव डॉ. नितीन करीर उपस्थित नसल्याने एक दिवसासाठी ही सभा तहकूब करण्यात आली आहे.

स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालकांची सभा गुरूवारी (दि. 20) सकाळी अकरा वाजता होणार होती. ती सव्वा बाराला सुरू झाली. अध्यक्ष डॉ. नितीन करीर काही कारणांमुळे अनुपस्थित होते. यावेळी महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, संचालक दत्ता साने, सचिन चिखले, प्रमोद कुटे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी नीळकंठ पोमण आदी उपस्थित होते. अध्यक्ष अनुपस्थित असल्याने बैठक तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले, शासकीय कार्यालयाचे कामकाज आणि पत्र व्यवहार मराठीतच असावा, असा शासन आदेश आहे. स्मार्ट सिटीचा अजेंडा देखील मराठीत असावा, अशी मागणी यापूर्वीही केली आहे. तरी देखील इंग्रजीतच अजेंडा मिळत आहे. राज्य सरकारने कार्यालयीन कामकाजात मराठीचा वापर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, स्मार्ट सिटी या शासन आदेशाला फाट्यावर देत आहे. आहे. दत्ता साने म्हणाले, स्मार्ट सिटी बैठकीचा अजेंडा मराठीतच असायला हवा. आजच्या सभेत आम्ही मागणी केली आहे.

त्याबाबत आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर म्हणाले, कंपनी कायद्यानुसार स्मार्ट सिटीचे काम चालते. त्यामुळे इंग्रजीतच विषय पत्र असते. आज सदस्यांनी मराठीत विषय पत्र असावे, अशी मागणी केली. त्यामुळे मराठीत अजेंडा दिला जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)