स्मार्ट सिटीच्या खोदाईस पालिकेचा नकार

शासकीय कंपनी नसल्याचा दावा : 38 ठिकाणची मागितली परवानगी

पुणे – शहरातील मोफत वाय-फाय सेवा आणि स्मार्ट एलीमेंटस प्रकल्पासाठी स्मार्ट सिटीने महापालिकेकडे सुमारे 38 ठिकाणी खोदाईची परवानगी मागितली आहे. मात्र, स्मार्ट सिटी शासकीय कंपनी नसल्याचे कारण देत ही परवानगी अडवून ठेवली असल्याची बाब समोर आली आहे.

-Ads-

स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिका, केंद्र शासन व राज्य शासनाच्या भांडवलातून पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) या कंपनीची स्थापना करण्यात आली असून त्यावर संचालक म्हणून, राज्य शासन, महापालिका पदाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच पोलीस आयुक्त या संचालक मंडळाचे सदस्य आहेत. या कंपनीकडून पुणे शहरासाठी मोफत वाय-फाय सेवा आणि स्मार्ट एलिमेंट प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शहरात सुमारे 200 ठिकाणी डीजीटल डिस्प्ले उभारण्यात येत आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी स्मार्ट सिटी कंपनीस काही प्रमाणात खोदाई करणे आवश्‍यक आहे. ही खोदाई काही ठिकाणी 100 मीटर तर काही ठिकाणी 200 ते 300 मीटर आहे. महापालिकेने पावसाळ्यात सर्वच प्रकारची खोदाई बंद केल्याने स्मार्ट सिटीनेही काम बंद केले होते. त्यानंतर महापालिकेने 1 ऑक्‍टोबर 2018 पासून पुन्हा खोदाईस परवानगी सुरू केली आहे. मात्र, ती केवळ शासकीय कंपन्यांच्या खोदाईलाच दिली जात असून त्यात महावितरण आणि एमएनजीएल या कंपन्यांचा समावेश आहे. तर महापालिकेच्या पथ विभागाच्या खोदाई शुल्क वाढविण्याचा निर्णय घेत नवीन धोरण शहर सुधारणा समितीपुढे ठेवण्यात आले आहे. मात्र, या धोरणास अद्याप मान्यता देण्यात आलेली नसल्याने या दोन संस्था व्यतिरिक्त कोणासही महापालिकेने खोदाईस परवानगी दिलेली नाही. त्यात स्मार्ट सिटीचाही समावेश आहे.

फक्त शासकीय कंपन्यांनाच परवानगी
याबाबत महापालिकेच्या पथ विभागाकडे चौकशी केली असता. प्रभारी प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी महापालिका आयुक्तांच्या आदेशाने केवळ शासकीय कंपन्यांच्या खोदाईस परवानगी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, स्मार्ट सिटी मध्ये महापालिका, राज्य शासन तसेच केंद्र शासनाचे भांडवल असताना ही शासकीय कंपनी होत नाही का? तसेच ही योजना बंद झाल्यावर हे प्रकल्प पालिकेचे असणार असल्याबाबत विचारणा केली असता. कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)