स्मार्ट सिटीकडून बाणेर भागात “फार्मर मार्केट’

ओटा मार्केटच्या जागेवर होणार विकसित


जागा तातडीने हस्तांतरित करण्याची पालिकेला मागणी

पुणे – पुणे स्मार्ट सिटीकडून पदपथावरील विक्रेत्यांसाठी बाणेर भागात स्मार्ट फार्मर मार्केट उभारले जाणार आहेत. त्यासाठी बाणेर येथील ओटा मार्केटचे आरक्षण असलेल्या सर्वे. नं. 85 मधील महानगरपालिकेच्या जागेची मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेकडून या जागेवर जेएनएनयुआरएम अंतर्गत हे ओटा मार्केट विकसित करण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्याचा वापर पूर्ण क्षमतेने सुरू नाही. महापालिका आणि स्मार्ट सिटीकडून करण्यात आलेल्या संयुक्त पाहणीत ही बाब समोर आली होती. त्यामुळे या मार्केटचा पुनर्विकास करून ते विकसित केल्यास या ठिकाणी रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले तसेच शेतकऱ्यांनाही थेट ग्राहकांना शेतमाल विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अत्याधुनिक ओटा मार्केट विकसित करून त्याला “स्मार्ट फार्मर मार्केट’ म्हणून विकसित करण्यासाठी ही आरक्षित जागा तातडीने स्मार्ट सिटीला हस्तांतरित करावी, अशी मागणी स्मार्ट सिटीने महापालिकेस पत्राद्वारे केली आहे.

“स्मार्ट फार्मर मार्केट’ ही अत्याधुनिक संकल्पना आहे. तिच्या माध्यमातून ओटा मार्केट विकसित केला जाणार आहे. त्याचा फायदा विक्रेते, फेरीवाले तसेच शेतकऱ्यांसह या भागातील नागरिकांनाही होणार आहे. त्या अनुषंगाने पहिल्या प्रकल्पासाठी बाणेर येथील या जागेची मागणी करण्यात आली असून त्यानंतर उर्वरित आरक्षित ओटा मार्केटच्या जागेच्या उपलब्धते नुसार हे “फार्मर मार्केट’ उभारले जाईल.

– राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)