‘स्मार्ट’ सायकल्स गायब ; कुलगुरूंचा मात्र नकार

संग्रहित छायाचित्र

जीपीएस बसविणार


दुरुस्तीसाठी सायकल्स पाठविल्याचा दावा

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पुणे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ओफो कंपनीच्या एकही सायकल विद्यापीठात आवारात दिसत नसल्याचे चित्र मिळत आहे. या कंपनीच्या सायकलींना जीपीएस यंत्रणा नसल्याने, या सर्व सायकल्स गायब केल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, खुद्द विद्यापीठाचे कुलगुरूंनी ही बाब फेटाळून लावली. या कंपनीच्या 177 सायकली दुरुस्तीसाठी अन्यत्र हलविण्यात आले. ही सर्व सायकली जीपीएस यंत्रणा बसवून पुन्हा विद्यापीठात वापरण्यात येणार असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

पिवळ्या सायकल सर्वच गायब आहेत, असे नाही. या सायकल विद्यापीठात वापरात आहेत. मात्र, यातील 177 सायकलींची दुरुस्ती केली जात आहे. त्यांना लॉकिंग सिस्टिम अन्‌ जीपीएस सिस्टिम राहणार आहे. त्या सर्व सायकली दुरुस्तीनंतर पुन्हा विद्यापीठात वापरल्या जाणार आहेत.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू

विद्यापीठात सायकल शेअरिंग योजना मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात “झूमकार पेंडल’च्या सहकार्याने हिरव्या रंगाच्या 100 सायकली विद्यापीठाला उपलब्ध करून दिल्या. त्यास विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 275 ओफो कंपनीच्या (पिवळ्या रंगाची) सायकली मोठ्या गाजावाजा करून विद्यापीठाकडे सुपूर्द करण्यात आल्या. मात्र, अवघ्या आठवडाभरात ओफो कंपनीच्या सायकल गायब होत असल्याचे दिसून येत आहे.

विद्यापीठ परिसरातील कर्मचारी, बाहेरील व्यक्‍तींकडून पिवळ्या सायकल चक्‍क घरात लपवून ठेवणे, त्यांना स्वत:कडील कुलूप लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ओफो कंपनीच्या सायकलीच्या योजनेचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रारंभीच्या काळात विद्यापीठात सर्वत्र दोनही टप्प्यातील सायकली दिसून येत होते. त्याचा वापरही विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करीत होते. मात्र ह्या सायकली गायब होत असल्याचे स्पष्ट होताच, विद्यापीठ प्रशासनाची डोकेदुखी वाढली. पिवळ्या रंगाच्या सायकलीही एकत्रित करून नेण्यात आले. त्यावरून ही योजनाच गुंडाळली गेल्याची चर्चा सुरू होती. सध्या तुरळक प्रमाणात सायकली अधूनमधून दिसत आहेत.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)