“स्मार्ट वॉच’ला मनसेचा विरोध

पिंपरी – शहरातील सफाई कामगारांना योग्य साधने उपलब्ध नसताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्चून “स्मार्ट वॉच’ घेण्याचा प्रस्ताव स्थाया समिती तहकूब न करता तो रद्दच करावा, अशी मागणी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीसमोर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती समोर “स्मार्ट वॉच’चा ठराव ठेवला होता. यासाठी दरमहा 286 अधिक “जीएसटी’प्रमाणे एकूण दरमहा 13 लाख 4 हजार 128 रुपये तर एका वर्षासाठी 1 कोटी 56 लाख 49 हजार 536 रुपये केवळ जीएसटी असे एकूण खर्च हा 6 कोटी 285 लाख 98 हजार 144 रुपयांचा खर्च येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा ठराव स्थायी समितीच्या समोर मांडण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला सफाई कामगारांना बूट, हातमोजे दिले गेले नाहीत. त्यांना मुलभूत सुविधा नसताना महापालिकेने अशा “वॉच’वर कोट्यावधी रुपये खर्च करु नयेत, त्यातल्या त्यात थेट पद्धतीने खरेदीला मनसेचा विरोध आहे. या निविदेचा अभ्यास करण्यासाठी हा प्रस्ताव तुर्तास स्थायी समितीने तहकूब ठेवला आहे. मात्र तो तहकूब न ठेवता सरळ रद्द करावा, अशी मागणी सचिन चिखले यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)