स्मार्ट लोकसहभाग संवाद; पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांबाबत नागरिकांशी सकारात्मक चर्चा

खुल्या वातावरणात स्मार्ट लोकसहभाग संवाद; नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद व कौतुक
पुणे: नेहमीच्या सभागृहात बैठक घेण्यापेक्षा पुणे स्मार्ट सिटीनेच विकसित केलेल्या स्मार्ट प्लेसमेकिंगच्या
ठिकाणी नागरिकांना निमंत्रित करून पुणे स्मार्ट सिटीच्या अधिकारी व प्रतिनिधींनी त्यांच्याशी विकासकामांबद्दल थेट संवाद साधला. या अभिनव लोकसहभाग संवाद बैठकीचे येथील नागरिकांनी उत्साहात स्वागत व कौतुक केले. स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांसाठी आयोजित लोकसहभाग बैठक बाणेर येथील ‘रिन्यू’ या प्लेसमेकिंगच्या ठिकाणी उत्साहात पार पडली. बाणेर, बालेवाडी परिसरातील नागरिक उत्स्फूर्तपणे बैठकीला उपस्थित होते. पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य ज्ञान अधिकारी मनोजित बोस यांनी बैठकीला संबोधित करत स्मार्ट सिटीमधील विविध संकल्पना स्पष्ट करत लोकांना समजावून सांगितल्या.

लोकसहभागाच्या या नव्या उपक्रमाबद्दल बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “पुणे शहराची मूळ स्वाभाविक वैशिष्ट्ये म्हणजे पुणेरीपण जपत स्मार्ट विकास करण्याचा आमचा मानस आहे.

मनोजित बोस म्हणाले, “आम्ही स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत नागरिकांचे म्हणणे खुलेपणाने ऐकून घेऊन त्याचा गांभीर्याने विचार करतो, त्यामुळे विकासकामांमध्ये एक प्रकारे थेट सहभागी होण्याची संधी नागरिकांना मिळते. नागरिकांना विकास प्रक्रियेत थेट सहभागी करून घेणाऱ्या संस्थांमध्ये पुणे स्मार्ट सिटी ही देशातील एकमेव स्मार्ट सिटी आहे.”

त्यासाठी लोकांना अनुकूल असा ‘पीपल फ्रेंडली’ प्रभावी विकास साधण्यासाठी लोकसहभाग बैठक (सिटीझन एंगेजमेंट) अधिक खुली व सर्वसमावेशक करत आहोत.” पुणे स्मार्ट सिटीअंतर्गत केल्या जाणाऱ्या विकासकामांबद्दल नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सिटिझन एंगेजमेंट बैठकीचे आयोजन करण्यात येते. या बैठकीमध्ये नागरिकांचे अभिप्राय व सूचना स्वीकारल्या जातात. औंध, बाणेर, बालेवाडी या परिसरातील नागरिकांची एकत्रित नागरिक सहभाग बैठक ही महिन्याच्या पहिल्या शानिवारी, तर या परिसरातील विविध भागांसाठी विकेंद्रित बैठक ही दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आयोजित केली जाते.

-Ads-

शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवणे व त्यांच्या गरजेनुसार त्यांना परवडणाऱ्याबाबी, अल्पावधीत व कमी वापरलेल्या जागांवर तयार करणे, हा प्लेसमेकिंग उभारणीमागचा दृष्टीकोन आहे. बाणेरमधील रिन्यू हे प्लेस मेकिंग ‘ई-लर्निंग व कौशल्य विकास’ या संकल्पनेवर तर एनर्जाईज ‘विरंगुळा व ध्यानधारणा’ या संकल्पनेवर आधारित आहे. या संकल्पानांना अनुसरून, या प्लेसमेकिंग्जमध्ये- फिरण्यासाठी मोकळ्या जागा, कार्यशाळा घेण्यासाठी अर्धवर्तुळाकार जागा, सर्क्युलर नायलॉन रोप सिटिंग, दगडांची गेबियन सिटिंग, मोबाईल चार्जिंग सुविधांसह सोलर सिटिंग, सोलर ट्री, लॅपटॉप बेंचेस, लहानमुलांसाठी झोके, टोटम पोल, वाय-फाय हॉटस्पॉट, वॉटर फाउंटन, एलईडी पेडेस्ट्रीयन लाईट, एम्फीथिएटर, इंटरएक्टिव्ह ह्यूमन प्लॅटफॉर्म- फ्लोअर चेस, नंबर गेम, बास्केट बॉल कोर्ट, गझीबो सिटिंग व योगा फिटनेस एरिया, किड्स प्ले एण्ड आउटडोअर फिटनेस एरिया इत्यादी सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)